मराठी बातम्या /बातम्या /करिअर /WFH बाबतची सर्वात मोठी बातमी; देशातील टॉप IT कंपन्याचा ऑफिस सुरु करण्याबाबत काय असेल निर्णय? जाणून घ्या

WFH बाबतची सर्वात मोठी बातमी; देशातील टॉप IT कंपन्याचा ऑफिस सुरु करण्याबाबत काय असेल निर्णय? जाणून घ्या

या सर्व गोष्टींमध्ये ऑफिस पुन्हा सुरु होणार की नाहीत? (when work from Office will start?) हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे.

या सर्व गोष्टींमध्ये ऑफिस पुन्हा सुरु होणार की नाहीत? (when work from Office will start?) हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे.

या सर्व गोष्टींमध्ये ऑफिस पुन्हा सुरु होणार की नाहीत? (when work from Office will start?) हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे.

मुंबई, 28 डिसेंबर: गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. मात्र आता Omicron नावाच्या कोरोनाच्या व्हेरिएन्टनं (Omicron cases India) जगभरातील लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण केली आहे. कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये (Work from Office) बोलावण्याचा तयारीत असलेल्या कंपन्यांना आता या Omicron मुळे निर्णय मागे घ्यावा लागतोय की काय अशी चिंता वाटू लागली आहे. तर आता सर्वकाही सुरळीत होणार आणि कोरोनाचा नायनाट होणार ही स्वप्नं बघणाऱ्या सामान्य नागरिकांमध्येही यामुळे दहशत निर्माण झाली आहे. मात्र या सर्व गोष्टींमध्ये ऑफिस पुन्हा सुरु होणार की नाहीत? (when work from Office will start?) हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे.

मात्र आता TCS, Wipro, Infosys, HCL आणि देशातील इतर मोठ्या IT कंपन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये (Work from Home policy of top It companies) बोलावण्यास किती उत्सुक आहेत याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज TCS आणि विप्रोने याआधीच कर्मचार्‍यांना अनुक्रमे 15 नोव्हेंबर आणि 14 सप्टेंबरपासून ऑफिसमध्ये बोलावणं सुरु केलं होतं. मात्र आता देशभरात omicron चे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे कंपन्या आपल्या या निर्णयाचा पुनर्विचार (IT work from home) करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतातही आता 4 दिवसांचा आठवडा? नवीन लेबर कोडचा पगारावर काय होणार परिणाम? वाचा

Infosys, HCL, Tech Mahindra सारख्या भारतातील IT कंपन्या Omicron Covid-19 प्रकाराबाबत अनिश्चिततेमध्ये कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत कधी बोलावू शकतील हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये. Deloitte आणि Mindtree सारख्या कंपन्या ज्या कथितपणे त्यांची ऑफिसेस उघडण्याची योजना आखत होत्या त्या भारतात Omicron रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आता संभ्रमात आहेत. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावून त्यांचा जीव धोक्यात घालण्याची रिस्क कोणीही घेऊ इच्छित नाही.

कोविड-19 महामारीतून निर्माण झालेली वर्क फ्रॉम होमची संकल्पना लॉकडाऊन जीवनशैलीत अखंडपणे मिसळली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की आता, कोणतीही उत्पादकता न गमावता घरून काम आणि हायब्रिड सेटअपशी कर्मचाऱ्यांनी जुळवून घेतले आहे, तेव्हा कर्मचार्‍यांना नवीन प्रकारात ऑफिसमध्ये बोलवणे ही एक जोखीम असेल जी आयटी कंपन्या घेण्यास तयार नसतील. म्हणूनच आता omicron च्या धर्तीवर IT कंपन्या आपले वर्क फ्रॉम मॉडेल पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, India, Work from home, जॉब