मुंबई, 07 फेब्रुवारी: संयुक्त प्रवेश परीक्षा, JEE मुख्य सत्र 1 मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने जेईई मेनचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन ते तपासू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला NIRF रँकिंगनुसार देशातील टॉप इंजीनिअरिंग कॉलेजेसची लिस्ट देणार आहोत. चला तर मग बघूया.
जेईई मेन ही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा आहे. देशभरातील आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. JEE Main पास केल्यानंतर JEE Advanced द्यावा लागेल, त्यानंतर विद्यार्थ्यांना IIT मध्ये प्रवेश मिळू शकेल.
हे आहेत देशातील टॉप इंजीनिअरिंग कॉलेजेस
1. IIT मद्रास, चेन्नई
2. आयआयटी दिल्ली
3. IIT बॉम्बे
4. आयआयटी कानपूर
5. IIT खरगपूर
6. IIT रुरकी
7. IIT गुवाहाटी
8. NIT तिरुचिरापल्ली
9. IIT हैदराबाद
10. एनआयटी कर्नाटक
11. जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता
12. वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोर
13. IIT BHU, वाराणसी
14. आयआयटी धनबाद
15. एनआयटी राउरकेला
16. IIT इंदूर
17. अण्णा विद्यापीठ, चेन्नई
18. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई
29. अमृता विश्व विद्यापीठम, कोईम्बतूर
20. IIT मंडी
21. IIT वरंगल
22. IIT रोपर, रुपनगर पंजाब
23. IIT गांधीनगर, गुजरात
24. विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, चेन्नई
25. एमिटी युनिव्हर्सिटी, गौतम बुद्ध नगर, यूपी
सध्या देशातील टॉप 25 अभियांत्रिकी महाविद्यालये कोणती आहेत. ही यादी भारत सरकारने जारी केलेल्या NIRF रँकिंग 2022 वर आधारित आहे-
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Education, Job