Government Job: पश्चिम मध्य रेल्वेत अनेक जागांसाठी बंपर भरती; आज अर्ज करण्याची शेवटची तारीख

Government Job: पश्चिम मध्य रेल्वेत अनेक जागांसाठी बंपर भरती; आज अर्ज करण्याची शेवटची तारीख

या पदांसाठी इच्छुक उमेदवार पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर wcr.indianrailways.gov.in किंवा mponline.gov.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. आज अर्ज करण्याची 30 एप्रिल 2021 शेवटची तारीख आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : पश्चिम मध्य रेल्वेकडून 10वी पास उमेदवारांसाठी अपरेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर wcr.indianrailways.gov.in किंवा mponline.gov.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. नोटिफिकेशनुसार, अपरेंटिससाठी एकूण 716 रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्याची आज 30 एप्रिल 2021 शेवटची तारीख आहे.

इच्छुक उमेदवारांनी पश्चिम रेल्वेकडून जारी करण्यात आलेलं अधिकृत नोटिफिकेशन वाचल्यानंतरच अर्ज करावा. नियमानुसार केलेला अर्जच मान्य केला जाईल. ऑनलाईन अर्जात कमी किंवा एखादी चूक झाल्यास, अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

या पदांसाठी होणार भरती -

अधिकृत नोटिफिकेशननुसार, फिटर, वेल्डर, वायरमॅन, कम्प्यूटर ऑपरेटर, मशिनरी, सर्वेयर, स्टेनोग्राफर, मॅकेनिक, पेंटर, कारपेंटर आणि इलेक्ट्रिशियन या पदांसाठी भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता -

या पदांसाठी अर्ज करताना 10 वी पास असणं अनिवार्य आहे. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयची डिग्री असणं आवश्यक आहे.

(वाचा - Success Story: चहा विकून कोट्यधीश झाला 'हा' व्यक्ती, महिन्याला कमावतो 1.2 कोटी)

वयोमर्यादा -

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 24 वर्ष असावं. ओबीसी प्रवर्गासाठी वयोमर्यादेत तीन वर्ष आणि एससी - एसटी प्रवर्गासाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.

(वाचा - SBI Recruitment 2021: SBI मध्ये 5237 जागांसाठी बंपर भरती; पाहा कसा कराल अर्ज)

निवड प्रक्रिया -

उमेदवारांनी निवड प्रक्रिया 10वी आणि आयटीआय आधारे तयार केलेल्या मेरिट लिस्टनुसार केली जाईल. उमेदवार या व्हॅकेन्सीबाबतची अधिक माहिती अधिकृत नोटिफिकेशनद्वारे घेऊ शकतात.

Published by: Karishma Bhurke
First published: April 30, 2021, 12:23 PM IST

ताज्या बातम्या