मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

नोकरी असो की व्यवसाय योग्य पद्धतीनं करा वेळेचं नियोजन; अशा पद्धतीनं शिका Time Management Tricks

नोकरी असो की व्यवसाय योग्य पद्धतीनं करा वेळेचं नियोजन; अशा पद्धतीनं शिका Time Management Tricks

Time Management बद्दलच्या काही टिप्स

Time Management बद्दलच्या काही टिप्स

आज आम्ही तुम्हाला अशाच काही Time Management टिप्स (Time management Tips) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचा वेळ योग्य प्रकारे मॅनेज करू शकाल.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 05 डिसेंबर: 'टाइम इज मनी' (Time is Money) हे आपण अगदी लहानपणीपासून ऐकत आलो आहे. दिवसाच्या चोवीस तासांपैकी आपण किती तास काम करण्यात घालवतो आणि किती तास अक्षरशः वाया (Avoid wasting of Time) घालवतो आहे आपल्यालाच माहिती असतं. खरं म्हणजे बहुतांश लोकांकडे वेळ नक्की कसा मॅनेज (How to manage Time) करायचा याबाबत काहीच ज्ञान नसतं. जेव्हा जे वाटेल ते काम करण्यास अनेक जण तयार असतात. मात्र याच वेळेचं महत्त्वं (Importance of time) आपल्याला एखाद्या मुलाखतीला उशीर झाल्यावर कळतं किंवा करिअरमध्ये (Career building), व्यवसाय (How to manage Time in Business) करत असताना कळतं. म्हणूनच Time Management खूपच महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही Time Management टिप्स (Time management Tips) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचा वेळ योग्य प्रकारे मॅनेज करू शकाल. दिनचर्येचं पालन करा    दिनचर्येचं पालन केलं तर विजय निश्चित होईल. त्यामुळे पूर्ण लक्ष केंद्रित करून तुमची दिनचर्या फॉलो करा. हा वेळ व्यवस्थापनाचा घटक आहे. तुमचा दिनक्रम कधी चुकला तर दर आठवड्याला विश्लेषण करणं गरजेचं आहे. तुम्हाला दिसेल की जर तुम्ही तुमचा दिनक्रम गेल्या आठवड्यात पूर्णपणे पाळू शकला नसाल तर ते उरलेले काम येत्या आठवड्यात पूर्ण करावं लागेल. यामुळे तुमच्यावर ताण वाढेल. म्हणूनच दिनक्रम ठरवून टाइम मॅनेज करायला शिका. आता घरबसल्या शिका SPACE बद्दल सर्वकाही; ISRO नं आणला Free Certification Course प्रत्येक गोष्टीला वेळ द्या जर तुम्हाला स्वतःला मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या निरोगी ठेवायचे असेल तर काही मजा देखील खूप महत्वाची आहे परंतु या कामांसाठी वेळ निश्चित करणे आवश्यक आहे आणि जर तुम्हाला चॅटींग, फेसबुक, ईमेल, टीव्हीची आवड असेल तर वेळ निश्चित करा. तसेच अभ्यासाची वेळही निश्चित करा. असे केल्याने तुमचा बराच वेळ वाचू शकतो. मल्टीटास्किंग टाळा मल्टीटास्किंगचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्या मुख्य कामावर पडतो. यामुळे तुमच्या कामाचा दर्जा खराब होतो. तुम्ही कितीही सक्षम असलात तरी एकाच वेळी अनेक गोष्टी केल्या तर तुमच्या कामाचा दर्जा खालावतो. मल्टीटास्किंग करताना, तुमचे लक्ष सर्व कामांवर असते, ज्यामुळे तुम्ही कोणतेही काम मनापासून करू शकत नाही. वाईट Communication Skills मुळे येतंय अपयश? चिंता नको. या टिप्स करा फॉलो Tools चा करा वापर तुमचा मोबाईल, कॅलेंडर किंवा चार्ट इत्यादीच्या मदतीने तुम्ही वेळेवर काम पूर्ण करू शकता. reminder सेट करण्याची सवय लावल्यास उत्तम. जेणेकरून तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल आणि नवीन कामे वेळेवर सुरू करू शकाल. फक्त reminder टाळण्याची सवय लावू नका आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करा.
First published:

Tags: Career, Tips

पुढील बातम्या