Home /News /career /

क्या बात है! 'ही' कंपनी जॉईन केली तर मज्जाच; देतेय 365 दिवस सुट्टी; पगारही मिळेल पूर्ण

क्या बात है! 'ही' कंपनी जॉईन केली तर मज्जाच; देतेय 365 दिवस सुट्टी; पगारही मिळेल पूर्ण

एक कंपनी कामगारांना चक्क 365 दिवस पगारी रजा (Paid Leave) देते. यावर, हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येईल; पण हे खरं आहे.

  मुंबई, 21 जून:  सध्याच्या काळात नोकरदार वर्गाला कामाचे दिवस (Working Days) आणि सु्ट्टी (Leave) यांचं गणित जमवणं अवघड होत चाललं आहे. काही क्षेत्रं अशी आहेत, की जिथं कामगाराला एका दिवसाची सुट्टी मिळवण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागतो. सुट्टीसाठी वारंवार बॉसला विनंती करावी लागते. एवढं करूनही मनासारखी सुट्टी मिळेल, याची खात्री नसते. अर्थात या स्थितीमागे मनुष्यबळाचा तुटवडा, तसंच अन्य अनेक कारणं आहेत; पण एक कंपनी कामगारांना चक्क 365 दिवस पगारी रजा (Paid Leave) देते. यावर, हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येईल; पण हे खरं आहे. एका कंपनीनं आपल्या धोरणांमध्ये (Policy) बदल करून कर्मचाऱ्यांना भरपूर पगारी रजा देण्याचं नियोजन केलं आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक-दोन नाही, तर 365 दिवस पगारी रजा ऑफर करते. मिशो कंपनीनं (Meesho Company) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्षभर पगारी रजा देण्याचं धोरण जाहीर केलं आहे. `झी न्यूज हिंदी`ने याबाबतची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मिशो कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 'मी केअर' (Mee care) नावाचं एक नवं धोरण लॉंच केलं आहे. त्यानुसार कर्मचारी एक वर्ष म्हणजेच 365 दिवस पगारी रजेचा लाभ घेऊ शकतात. यात कर्मचाऱ्यानं स्वतःच्या आजारपणासाठी सु्ट्टी घेतली, तर कंपनी त्याला पूर्ण पगार देणार आहे. कर्मचाऱ्यानं कुटुंबातल्या एखाद्या सदस्याच्या आजारपणासाठी सुट्टी घेतली, तर त्याला तीन महिन्यांच्या कालावधीसाठी 25 टक्के पगार कंपनीकडून दिली जाणार आहे. JEE Mains 2022: मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर JEE परीक्षेचं Admit Card जारी
  तसंच, कर्मचाऱ्याला सुट्टीच्या कालावधीत पीएफ, विमा यांसारख्या सुविधा दिल्या जातील. आजारपण (Sick) किंवा उपचाराव्यतिरिक्त (Treatment) अन्य कारणासाठी सुट्टी घेतली, तर संबंधित कर्मचाऱ्याला कोणताही पगार दिला जाणार नाही; पण कर्मचारी वैद्यकीय कारणासाठी (Medical Treatment) किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी अशा प्रकारे सुट्टी घेऊ शकणार आहेत. `इकॉनॉमिक टाइम्स`च्या वृत्तानुसार, कर्मचारी त्यांची आवड जोपासण्यासाठीदेखील वेळ काढू शकणार आहेत.
  `इकॉनॉमिक टाइम्स`नं मिशोचे सीआरओ आशिष कुमार सिंग यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे, की मोठ्या प्रमाणावर कर्मचारी या धोरणाचा लाभ घेतील अशी अपेक्षा कंपनीला नाही. त्याच वेळी पगारी रजा घेणारा कर्मचारी अप्रैझल सायकल (Appraisal cycle) अर्थात मूल्यांकन चक्रात सहभागी होऊ शकेल. रजेवरून परतल्यावर संबंधित कर्मचारी ज्या पदावर होता, त्याच पदावर पुन्हा काम करू शकेल. मिशो कंपनीच्या या अनोख्या धोरणाचा कर्मचारी वर्गाला किती फायदा होईल, किती कर्मचारी या धोरणाचा लाभ घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job

  पुढील बातम्या