मुंबई, 23 मे : सध्या देशभरातील अनेक परीक्षांना ब्रेक लावण्यात आला आहे. देशभरात कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढत असल्याने अद्यापही शैक्षणिक संस्था सुरू करण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही. दुसरीकडे तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्यामुळे परीक्षा आणि शाळा सुरू करण्याकड़े कल नसल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान 12 वीच्या सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. 12 वीची सीबीएससीची परीक्षा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही परीक्षा कधी होणार, कोणत्या पद्धतीने घेतली जाणार याबाबतची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री निशंक 1 जून रोजी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 जून रोजी 12 वीच्या सीबीएससी परीक्षांच्या तारखेंची घोषणा करण्यात येऊ शकते. ( 12th CBSE board exam) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी कोरोनाच्या नियमावलीत ज्या प्रकारे जुलैमध्ये परीक्षा झाली होती, त्या प्रमाणेच यंदाही जुलै महिन्यात परीक्षांचं आयोजन केलं जाऊ शकतं. केंद्राकडून सर्व राज्यांना याबाबत आवाहन करण्यात आलं आहे. येत्या 3 दिवसात सर्व राज्यांनी परीक्षांबाबत त्यांचे निर्णय लिखित स्वरुपात शिक्षण मंत्रालयाला पाठवावेत. यानंतरच 1 जूनपर्यंत यावर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा-SC Exams: कोर्टानं फटकारल्यानंतरही परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम
दरम्यान सीबीएसई बोर्डा (CBSE Board)च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केलं आहे. आज वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, CBSE, Corona spread