मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

गायक होण्याचं स्वप्न पाहणारे डॉ. हरिओम झाले IAS, कसा होता हा प्रवास?

गायक होण्याचं स्वप्न पाहणारे डॉ. हरिओम झाले IAS, कसा होता हा प्रवास?

IAS डॉ. हरिओम

IAS डॉ. हरिओम

आयएएस डॉ. हरिओम आहे यांची क्षमता त्यांच्या शिक्षकांनी आणि त्यांच्या वडिलांनी ओळखली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  Khushalkant Dusane

नवी दिल्ली, 24 जानेवारी : देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा (UPSC) मध्ये बसणे हे या देशातील लाखो तरुणांचे स्वप्न असते. पण यात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. यामध्ये काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात, तर काही उमेदवारांना अनेक प्रयत्नांनंतर यश मिळते.

आयएएस डॉ. हरिओम आहे यांची क्षमता त्यांच्या शिक्षकांनी आणि त्यांच्या वडिलांनी ओळखली होती. त्यांना फक्त एक चांगला विद्यार्थी व्हायचे होते. त्यांना गायकही व्हायचे होते. त्यामुळे ते आजपर्यंत आपल्या नोकरीसोबत आपला छंदही जपत आहे. आज जाणून घेऊयात, आयएएस डॉ. हरिओम यांच्या यशस्वी प्रवासाबाबत.

IAS अधिकारी डॉ. हरिओम हे 1997 च्या बॅचचे IAS आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील कटारी या छोट्या गावात जन्मलेल्या डॉ. हरिओम यांनी प्राथमिक शिक्षण अलाहाबाद येथून केले. हरिओम जेव्हा अलाहाबाद विद्यापीठात अभ्यासासाठी गेले तेव्हा त्यांना तिथे वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. अलाहाबाद विद्यापीठातील त्यांचे बहुतेक वर्गमित्र आयएएस आणि पीसीएस होण्याबद्दल बोलत असत. यातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांच्यावर तेथील प्रेरणादायी वातावरणाचा परिणाम झाला आणि त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा - UPSC चे वेड, नापास झाल्यावर दिल्या 60 मॉक टेस्ट, अखेर तिने करुन दाखवलं!

अलाहाबाद विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, हरिओम हे 1992 मध्ये जेएनयूमध्ये पुढील शिक्षणासाठी. यूपीएससीबाबत जेएनयूमधील विद्यार्थी अधिक गंभीर वाटले. इथले विद्यार्थी आयएएस परीक्षेबद्दल जास्त बोलायचे. दिल्ली हे मोठे शहर आहे त्यामुळे परीक्षेसाठी लागणारे सर्व मार्गदर्शन त्यांना येथे मिळाले. हरिओम यांनीही याचा लाभ घेतला. त्यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी नुसतेच ठरवले नाही तर UPSC उत्तीर्ण केली आणि 1997 मध्ये त्यांची IAS सेवेसाटी निवड झाली.

सुरुवातीपासूनच त्यांनी गायक होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण या स्वप्नाला त्यांनी आपला छंद बनवला. ते आजही गातात. तसेच त्यांच्या गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर

पाहायला मिळतात. काही काळापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता जो व्हायरलही झाला होता. हा व्हिडीओ काश्मीरमधील होता. यामद्ये ते त्यांच्या मित्रांसोबत दल लेकजवळ गाणे म्हणत होते. लहानपणापासूनच त्यांना गझल, गाणी आणि भजन आणि कीर्तनाची आवड आहे. हे ऐकत ते मोठे झाले. त्यामुळे संगीत त्यांच्या नसानसात होते, असे तुम्ही म्हणू शकता. त्यांचा प्रवास यूपीएससीच्या उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

First published:

Tags: Career, Ias officer, Inspiring story, Success story, Upsc, Upsc exam