नवी दिल्ली, 20 जानेवारी : बहुतेक उमेदवारांना वाटते की ही यूपीएससी परीक्षा इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्यांसाठी सोपी आहे. मात्र, रवी सिहाग हे हिंदी माध्यमाचे विद्यार्थी असूनही या परीक्षेत त्यांनी तब्बल 3 वेळा यश मिळवले. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले आयएएस अधिकारी रवी कुमार सिहाग हे हिंदी माध्यमात शिकणाऱ्या उमेदवारांसाठी एक उदाहरण आहेत. आज जाणून घेऊयात, त्यांचा यशस्वी प्रवास.
आयएएस रवी कुमार सिहाग हे राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1995 रोजी झाला. त्यांचे वडील रामकुमार सिहाग हे शेतकरी असून आई विमला देवी गृहिणी आहेत. पदवीपर्यंत रवीही वडिलांना शेतात मदत करत असत. तीन बहिणींमध्ये आयएएस अधिकारी रवी कुमार सिहाग हे एकुलते एक भाऊ आहेत.
आयएएस रवी कुमार सिहाग यांनी हिंदी माध्यमातून शिक्षण घेतले आहे. त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण मनमोहन सरांच्या वडिलोपार्जित गाव 3 बीएएम विजयनगर श्रीगंगानगर येथील सरस्वती विद्या मंदिरातून घेतले. त्यानंतर, त्यांनी अनुपगढमधील शारदा स्कूलमधून 11वी आणि विजयनगरमधील वरिष्ठ माध्यमिक शाळेतून 12वी उत्तीर्ण केली. त्यांनी अनुपगड येथील शारदा कॉलेजमधून बीए केले.
हेही वाचा - यशाचा एकच फॉर्म्युला.. 600 पेक्षा जास्त सोलो परफॉर्मन्स देणारी डान्सर कशी झाली IAS अधिकारी?
रवी कुमार सिहाग यांनी UPSC परीक्षेचे 4 प्रयत्न केले होते. त्यापैकी 3 मध्ये ते यशस्वी झाले होते. 2018 मध्ये पहिल्या प्रयत्नात त्यांनी 337 वी रँक मिळवली होती. यावेळी त्यांना भारतीय संरक्षण लेखा सेवा मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 2019 मध्ये 317 वा क्रमांक मिळवली होती. यावेळी त्यांना भारतीय रेल्वे वाहतूक सेवा मिळाली होती. मात्र, 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात ते मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही. पण तरीही ते खचले नाहीत. त्यांनी पुन्हा 2021 मध्ये चौथ्या प्रयत्नात 18 वी रँक मिळवत यशाला गवसणी घातली.
2021 च्या UPSC परीक्षेत, सुरुवातीचे 17 रँक असलेले उमेदवार इंग्रजी माध्यमाचे होते. रवी कुमार सिहाग हे हिंदी माध्यमाचा उमेदवार होते आणि त्यांनी 18 वी रँक मिळवली होती. त्यानुसार रवी कुमार सिहाग यूपीएससी परीक्षेत 2021 मध्ये हिंदी माध्यमात टॉपर होते. त्यांचा हा प्रवास यूपीएससी परीक्षा देणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Ias officer, Inspiring story, Success story, Upsc