Home /News /career /

शेतकऱ्याच्या मुलानं 98.2% मिळवून रचला इतिहास; अमेरिकेतील टॉप विद्यापीठात घेणार प्रवेश

शेतकऱ्याच्या मुलानं 98.2% मिळवून रचला इतिहास; अमेरिकेतील टॉप विद्यापीठात घेणार प्रवेश

शेतकराचा हा लेक अमेरिकेत जाऊन अर्थशास्त्रावर उच्च शिक्षण घेऊ इच्छितो

    नवी दिल्ली, 15 जुलै : सीबीएसई बोर्डाच्या निकालानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. विद्यार्थी आपल्या निकालानंतर कुठे प्रवेश घ्यायचा याची पडताळणी करीत आहेत. यात एका शेतकऱ्याच्या मुलानं इतिहास रचला आहे. ही कहाणी आहे उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यातील एका सरसन नावाच्या छोट्याशा गावातील. येथील अनुराग तिवारी नावाच्या मुलाची आहे त्यांच्या कष्टाची. त्याला सीबीएसई 12 वीमध्ये 98.2 टक्के गुण मिळाले आहेत. इतके चांगले मार्क मिळविल्यानंतर आता अमेरिकेतील मोठ्या विद्यापीठात प्रवेश घेण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे हा प्रवेश त्याला पूर्ण स्कॉलरशीपवर मिळणार आहे. लखीमपूर जिल्ह्यातील या गावातील अनुराग तिवारी म्हणाला की त्याचं कॉर्नेल विद्यापीठात निवड झाली आहे. येथे तो अर्थशास्त्रात उच्च प्रशिक्षण घेऊ शकेल. हे वाचा-'मला केवळ केमिस्ट्रित 24 मार्क होते', VIRAL झाली IAS अधिकाऱ्याची मार्कशिट 12 वीतील हे गुण केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाद्वारे घोषित परीक्षेनुसार 18 वर्षांचा कला शाखेतील अनुरागला गणितात 95, इंग्रजीत 97, राजशास्त्र 99, इतिहास आणि अर्थशास्त्रात पूर्ण 100 मार्क मिळाले आहे. अनुरागच्या या निकालामुळे त्याचं Cornell Dream  सत्यात उतरलं आहे. त्याने Scholastic Assessment Test (SAT)  यातही 1370 गुण मिळविले आहे. ही टेस्ट डिसेंबर 2019 मध्ये अमेरिकेतील मुख्य विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी करण्यात आला होता. हे वाचा-कमाल आहे! दिव्यांशीने 12 वीत प्रत्येक विषयात मिळवले 100 पैकी 100 मार्क अनुरागचं आयुष्य सोपं नव्हतं. घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला खूप कष्ट करावे लागले. मात्र आता या कष्टाचं फळ त्याला मिळालं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Farmer

    पुढील बातम्या