Home /News /career /

TMC Recruitment: ठाणे महानगरपालिकेत विविध वैद्यकीय पदांसाठी नोकरीची संधी; असं करा अप्लाय

TMC Recruitment: ठाणे महानगरपालिकेत विविध वैद्यकीय पदांसाठी नोकरीची संधी; असं करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे.

    ठाणे, 14 सप्टेंबर: ठाणे महानगरपालिकेत (Thane Mahanagarpalika Recruitment 2021) विविध वैद्यकीय पदांसाठी लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Thane jobs) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक, वैद्यकीय निरीक्षक, CSSD सहाय्यक, फार्मासिस्ट, नाभिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक (Medical Social Work Superintendent) वैद्यकीय निरीक्षक (Medical Inspector) CSSD सहाय्यक (CSSD Assistant) फार्मासिस्ट (Pharmacist) नाभिक (Nabhik) पात्रता आणि अनुभव वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक (Medical Social Work Superintendent) - मास्टर इन सोशल वर्क पदवी आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. वैद्यकीय निरीक्षक (Medical Inspector) - स्वच्छता निरीक्षकाचा कोर्स आवश्यक आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. CSSD सहाय्यक (CSSD Assistant) -  ITI किंवा मशिनिस्ट कोर्स आवश्यक. फार्मासिस्ट (Pharmacist) - D.pharm  कोर्स आवश्यक नाभिक (Nabhik)- आठवी पास आवश्यक. हे वाचा - NEET 2021 Leaked: NEET पेपर लीक झाल्याचं उघड; जयपूरमधून 8 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात इतका मिळणार पगार वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक (Medical Social Work Superintendent) - 30,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय निरीक्षक (Medical Inspector) - 25,000/-  रुपये प्रतिमहिना CSSD सहाय्यक (CSSD Assistant) - 20,000/-  रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 15,000/-  रुपये प्रतिमहिना नाभिक (Nabhik) - 15,000/-  रुपये प्रतिमहिना या पत्त्यावर पाठवा अर्ज राजीव गांधी मेडिकल कॉलेज व छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा, ठाणे. अर्ज करण्याची शेवटची तारीख -  27 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Thane

    पुढील बातम्या