मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

WhatsApp आणि Facebook चा सरकार करणार असा वापर

WhatsApp आणि Facebook चा सरकार करणार असा वापर

 शिक्षणव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकद्वारे शिक्षकांना जोडणार आहे.या उपक्रमात 42 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल.

शिक्षणव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकद्वारे शिक्षकांना जोडणार आहे.या उपक्रमात 42 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल.

शिक्षणव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकद्वारे शिक्षकांना जोडणार आहे.या उपक्रमात 42 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल.

  • Published by:  Arti Kulkarni
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुक हा आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. याच व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकचा वापर सरकार शिक्षकांच्या ट्रेनिंगसाठी करणार आहे. शिक्षणव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकद्वारे शिक्षकांना जोडणार आहे.या उपक्रमात 42 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. असं देणार ट्रेनिंग वर्गामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण दिल्यानंतर व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुक पेज बनवलं जाईल. या माध्यमातून शिक्षक एकमेकांशी जोडलेले राहतील आणि त्यांच्यातला संवाद वाढेल. या प्रशिक्षणानंतर शिक्षक त्यांच्या समस्या एकमेकांशी शेअर करतील आणि त्यावर उपाय काढता येईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणाबद्दलच्या 'निष्ठा' उपक्रमाची घोषणा केली. शिक्षक होण्यासाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे. कुणीही आता असंच शिक्षक बनू शकणार नाही. त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यामध्ये पॉक्सो कायदा आणि अपंग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचं प्रशिक्षण शिक्षकांना दिलं जाईल, असं ते म्हणाले. बँकिंग क्षेत्रावर मंदीचं सावट,आता या बँकेतही होणार नोकरकपात आता एकवेळ IAS बनणं सोपं असेल पण शिक्षक होणं नाही, असंही रमेश पोखरियाल म्हणाले. शिक्षक एका विद्यार्थ्यामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये बदल घडवू शकतात. त्यामुळे त्यांचं प्रशिक्षण महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं. शिक्षकांच्या ट्रेनिंगमधले महत्त्वाचे मुद्दे 1. शिकवण्यासोबतच नेतृत्वाचंही ट्रेनिंग 2. भाषा, गणित आणि सामाजिक विज्ञानावर भर 3. शिक्षकांच्या ट्रेनिंगची ऑनलाइन पाहाणी 4. ट्रेनिंगमध्ये हजेरीवरही लक्ष =============================================================================================================== सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना; उद्धव ठाकरे म्हणतात....
First published:

Tags: Career, Facebook, Teachers, Whats app group

पुढील बातम्या