मराठी बातम्या /बातम्या /करिअर /TCS Recruitment 2021: एमबीए फ्रेशर्सला टीसीएसमध्ये नोकरीची संधी, आजच करा अप्लाय

TCS Recruitment 2021: एमबीए फ्रेशर्सला टीसीएसमध्ये नोकरीची संधी, आजच करा अप्लाय

TCS Recruitment : उमेदवाराला आधीच्या कामाचा अनुभव असला तर तो त्याला दिल्या जाणाऱ्या पदाच्या किंवा प्रोफाईलच्या अनुषंगाने गृहित धरला जाईल.

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : कोविड महामारीनंतर हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. उद्योगचक्र सुरळीत सुरू होऊनही बराच काळ उलटला आहे. यामुळे आता विविध क्षेत्रांत नोकऱ्या निर्माण होत आहेत. आयटी क्षेत्रातील व्यवसाय कोरोना काळातही सुरू होते. तरीही काही कारणांनी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. आता मात्र नोकऱ्या उपलब्ध होत आहेत आणि आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) (Tata Consultancy Services (TCS)) नुकतंच एमबीएचं शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.

    टीसीएसनी आपल्या ‘एमबीए हायरिंग’ या अभियानाअंतर्गत एमबीए फ्रेशर्सपैकी ज्यांना 2022-2023 या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच कंपनीने विशेषत्वाने एमबीए मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्ससाठी (Management Graduates) ही योजना सुरू केली आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर असून त्यानंतर सर्व पदांसाठीच्या परीक्षेची तारीख कंपनी जाहीर करणार आहे, अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. त्याबाबत सविस्तर माहिती देणारं वृत्त लाइव्ह मिंट ने दिलं आहे.

    कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, एका यशस्वी करिअरचा मजबूत पाया रचण्याची संधी भारतभरातील उमेदवारांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. यात 2020, 2021 आणि 2022 या वर्षांमध्ये एमबीएची परीक्षा उत्तीर्ण (MBA Exam Passed) झालेलेच उमेदवार या अभियानाअंतर्गत अर्ज करू शकतात. म्हणजे या तीन वर्षांमध्ये परीक्षा उत्तीर्ण न केलेले उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.

    वाचा : महावितरण भरती: 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 69 जागांसाठी नोकरीची संधी; अशा पद्धतीनं करा अप्लाय

    असं करा अल्पाय

    अर्ज करण्यासाठी तुम्ही TCS Next Step Portal ला लॉगइन करा. 

    त्यानंतर Register and apply for the TCS MBA Hiring हा पर्याय निवडा.

    जर तुम्ही आधीच पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इन करून अर्ज भरा. अर्ज भरून तो सबमिट केल्यानंतर आठवणीने ‘Apply For Drive’ या पर्यायावर क्लिक करा.

    जर तुम्ही पहिल्यांदाच पोर्टलवर आला असाल तर Register Now वर क्लिक करून ‘IT’ ही कॅटेगरी निवडून पुढे अर्जात तुमची माहिती भरा. अर्ज सबमिट केल्यानंतर ‘Apply For Drive’ यावर क्लिक करा.

    परीक्षा देण्याचा मोड Remote निवडा आणि ‘Apply’ वर क्लिक करा.

    तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी ‘Track Your Application’ वर जा. इथं तुमचं स्टेटस ‘Applied for Drive’ असं दिसायला हवं. तसं स्टेटस दिसलं तर तुम्ही योग्य पद्धतीने अर्ज केल्याचं सिद्ध होतं.

    या नोकरीसाठी तुमचं वय किमान 18 वर्षं पूर्ण आणि जास्तीत जास्त 28 वर्षांपर्यंत असावं. तसंच तुम्ही 2 वर्षांचा पूर्णवेळ MBA/MMS/ PGDBA/PGDM/ कोर्स पुढील विषयांमध्ये Marketing / Finance / Operations / Supply Chain Management / Information Technology / General Management / Business Analytics / Project Management पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे.

    अर्ज करण्यासाठी 10 वी, 12 वी, डिप्लोमा (लागू असल्यास), पदवी आणि किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षेतील सर्व विषयांत सर्व सेमिस्टरला कमीतकमी अग्रीगेट 60 टक्के गुण मिळालेले असणं गरजेचं आहे. या सर्व शिक्षणातील शेवटचं वर्ष व्यवस्थित परीक्षा देऊन पूर्ण झालेले उमेदवारच या पदासाठी अर्ज करू शकतात.

    वाचा : SBI PO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये PO पदाच्या तब्बल 2056 जागांसाठी भरती; इतका मिळेल पगार

    अर्ज करण्यासाठी उमेदवाराने MBA किंवा इंटिग्रेटेड MBA करण्यापूर्वी B. TECH / B.E चं शिक्षण घेतलेलं असणं अनिवार्य आहे. एमबीएच्या 2020, 2021आणि 2022 या वर्षी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच या पदासाठी अर्ज करता येणार आहे.

    उमेदवाराला आधीच्या कामाचा अनुभव असला तर तो त्याला दिल्या जाणाऱ्या पदाच्या किंवा प्रोफाईलच्या अनुषंगाने गृहित धरला जाईल.

    टीसीएसच्या या पदासाठी अर्ज करताना परीक्षेत बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये इतर कुठलेही शिक्षण घेतलं असेल तर त्यांना अर्ज करायला परवानगी नाही.

    उमेदवाराने कोणत्याही कारणाने शिक्षणात गॅप घेतली असेल तर ती 2 वर्षांपेक्षा अधिक नसावी तसंच जर गॅप घेतली असेल तर उमेदवाराने तसं जाहीर करणं अनिवार्य आहे. गॅप घेतलेल्या उमेदवाराला त्याचं अधिकृत डॉक्युमेंट देऊन गॅप घेण्याचं कारण सांगावं लागेल.

    उमेदवाराने शाळा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे पूर्णवेळ शाळेत जाऊन घेतलेलं असावं. ज्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक आणि किंवा उच्च माध्यमिक शिक्षण नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूलिंगच्या (National Institute of Open Schooling) माध्यमातून घेतलं असेल पण त्यांनी इतर कोर्सेस पूर्ण वेळ पद्धतीने शिकले असतील तर ते या पदासाठी अर्ज करू शकतात.

    वाचा : Accenture कंपनीत 2022, 2021, 2020 या बॅचेसच्या फ्रेशर्ससाठी नोकरी; लगेच करा अप्लाय

    कंपनीच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उमेदवाराला 90 मिनिटांत 47 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील ज्यात 7 प्रश्न भाषाज्ञानाशी संबंधित

    Verbal Aptitude (7 Questions), 20 प्रश्न क्वांटिटेटिव्ह ज्ञानाशी संबंधित

    Quantitative Aptitude (20 Questions) तर 20 प्रश्न व्यावसायिक ज्ञानाशी

    Business Aptitude (20 Questions) संबंधित असतील.

    टीसीएसचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजेश गोपीनाथन म्हणाले, ‘उद्योगात होत असलेल्या बदलांमुळे आमच्या कंपनीतील कर्मचारी कपातीचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे पण एकूणात उद्योगाचा विचार केल्यास आम्ही कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्याचं प्रमाण उत्तम राखलं आहे.’ टीसीएस 2022 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 35 हजार जणांना नोकरी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही या नोकरीला पात्र असाल तर लवकर ऑनलाईन अर्ज करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा.

    First published:
    top videos

      Tags: Job, Tata group