मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मोठी बातमी! TCS कर्मचाऱ्यांसाठी 15 नोव्हेंबर तारीख ठरणार महत्त्वाची; कंपनीनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मोठी बातमी! TCS कर्मचाऱ्यांसाठी 15 नोव्हेंबर तारीख ठरणार महत्त्वाची; कंपनीनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जाणून घेऊया याबद्दलच्या डिटेल्स

जाणून घेऊया याबद्दलच्या डिटेल्स

देशातील मोठी नामांकित कंपनी TCS नं आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 16 ऑक्टोबर: जगभरात गेल्या दीड वर्षांपासून थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीनं (Corona) अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळेच जगभरातील जवळपास सर्व कॉर्पोरेट कंपन्या वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहेत. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी (Work from end for TCS) आपल्या कर्मचाऱ्यांना परत ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांपैकी आघाडीवरील नाव म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS). देशातील मोठी नामांकित कंपनी TCS नं आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी तारीखही ठरवण्यात आली आहे. यासंबंधीचं वृत्त इकोनॉमिक टाइम्सनं दिलं आहे.

TCS नं आपल्या कर्मचाऱ्यांना 15 नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या डेप्युटेड ब्रांचेसमध्ये (TCS office opening date) म्हणजेच कर्मचारी या  आधी ज्या ब्रांचमध्ये काम करत होते त्या ब्रांचेसमध्ये परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. वर्क फ्रॉम होम बंद (TCS work from home end) होताना कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम ऑफिसची लवकरात लवकर सवय व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात यासाठी कर्मचाऱ्यांची प्रकृती आणि इतर बाबींचा विचार करूनच कंपनीकडून कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

हे वाचा -  Mumbai Job Alert: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई इथे जागा रिक्त

TCS चे भारतात आणि परदेशात सध्या सुमारे 5 लाख 28 हजार 748 कामगार आहेत. टीसीएसच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ शाखांमध्ये परत जाण्यास सांगण्याचा निर्णय या आठवड्याच्या सुरुवातीला TCS चे  कार्यकारी उपाध्यक्ष आणि ग्लोबल HR हेड प्रमुख मिलिंद लक्कड यांनी घेतला होता. सध्या TCS चे सुमारे 5% सहयोगी कार्यालयांमधून काम करतात असं TCS नं म्हंटलं आहे.

याआधी कंपनीनं हायब्रीड मॉडेल (hybrid model) 25×25 (What is 25x25 hybrid model?) हे मॉडेल विकसित केलं आहे. यानुसार कंपनीतील 25 टक्के कर्मचारी हे 2025 पर्यंत पूर्णतः सुविधांशिवाय काम करणार आहेत.

आम्ही आमच्या सहयोग्यांना 25 X 25 मॉडेलवर स्विच करण्यापूर्वी, कमीतकमी सुरुवातीला कार्यालयात परत येण्यास प्रोत्साहित करू. हे टप्प्याटप्प्यानं केलं  जाईल आणि संबंधित टीम लीडर आणि प्रत्येक टीम/ प्रोजेक्टच्या आवश्यकतांवर अवलंबून असेल, ”असं कंपनीनं म्हंटलं आहे. "

First published:

Tags: Career opportunities, जॉब