Home /News /career /

TATA फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे इथे 'या' पदासाठी होणार भरती; अशा पद्धतीनं करा अप्लाय

TATA फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे इथे 'या' पदासाठी होणार भरती; अशा पद्धतीनं करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

    पुणे, 06 सप्टेंबर: TATA फंडामेंटल रिसर्च इन्स्टिटयूट पुणे (Tata Institute of Fundamental Research Mumbai) इथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (TIFR Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. संचालक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती संचालक (Director) पात्रता आणि अनुभव संचालक (Director) - उमेदवाराकडे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगणक विज्ञान किंवा इतर कोणत्याही संबंधित आंतरशाखीय क्षेत्रात डॉक्टरेट पदवी असणं आवश्यक आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शैक्षणिक प्रतिष्ठा असलेले उत्कृष्ट वैज्ञानिक असणं आवश्यक  आहे. तसंच 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पत्त्यावर पाठवा अर्ज अवर सचिव कार्यालय, DAE आणि अध्यक्ष, अणुऊर्जा आयोग अणुऊर्जा विभाग, अनुशक्ती भवन, CSM मार्ग, मुंबई – 400001 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 31 ऑक्टोबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.tifr.res.in/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या