मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

NEET Result 2021:लवकरच लागणार NEET चा निकाल; मुंबई हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानं केला रद्द

NEET Result 2021:लवकरच लागणार NEET चा निकाल; मुंबई हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानं केला रद्द

महाराष्ट्र तर्फे 30 डिसेंबरपासून राज्य कोट्यातील जागांसाठी काउन्सिलिंग

महाराष्ट्र तर्फे 30 डिसेंबरपासून राज्य कोट्यातील जागांसाठी काउन्सिलिंग

NEET परीक्षेच्या निकालाची (NEET 2021 result date) प्रतीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 28ऑक्टोबर: कोरोनामुळे यंदाची NEET परीक्षा लांबणीवर गेली होती. मात्र त्यानंतर NEET परीक्षा (NEET 2021 Result) संपूर्ण देशभरात घेण्यात आली. या परीक्षेत काही संस्थांकडून घोटाळा करण्यात आला असेही आरोप करण्यात आले होते. त्याच पार्श्ग्वाभूमीवर मुंबई हायकोर्टानं NEET 2021 (neet 2021 latest news) परीक्षेचा निकाल राखून ठेवण्यात यावा असे आदेश दिले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court on NEET Result) हे आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे NEET परीक्षेच्या निकालाची (NEET 2021 result date) प्रतीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं एनटीएला निकाल रोखून ठेवण्यास सांगितलं होतं आणि परीक्षेचा प्रयत्न करताना अडचणी आलेल्या दोन विद्यार्थ्यांसाठी पुन्हा वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. मात्र दोन विद्यार्थ्यांसाठी इतर सर्व विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवणं अमान्य असल्यामुळे सुप्रीम कोर्टानं आदेश रद्द करत NEET चा निकाल (neet latest news) लवकरच जाहीर करण्यात यावा असे आदेश दिले आहेत.

16 लाख विद्यार्थी आहेत जे निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आम्ही नोटीस जारी करू आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊ. NTA ना निकाल लवकरात लवकर जाहीर करावा" असं सुप्रीम कोर्टानं NTA ;या सांगितलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, संजीव खन्ना आणि बीआर गवई यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध एनटीएच्या याचिकेवर सुनावणी केली.

BREAKING: MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; इथे बघा तुमचा निकाल

त्या दोन विद्यार्थ्यांचं काय?

"दिवाळीनंतर दोन विद्यार्थ्यांचे काय होईल ते आम्ही ठरवू. दरम्यान, आम्ही नोटीस जारी करतो आणि काउंटर दाखल करतो. मात्र आम्ही १६ लाख विद्यार्थ्यांचे निकाल रोखू शकत नाही, " असं खंडपीठानं स्पष्ट केलं आहे.

काय होता मुंबई हायकोर्टाचा आदेश

मुंबई हायकोर्टानं NTA ला दोन विद्यार्थ्यांसाठी नवीन परीक्षा घेण्याचे आणि मुख्य निकालांसह त्यांचे निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. वैष्णवी भोपाली आणि अभिषेक शिवाजी या दोन वैद्यकीय इच्छुकांची चाचणी पुस्तिका आणि ओएमआर शीट चाचणी सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर मिसळल्याच्या वस्तुस्थितीची उच्च न्यायालयाने दखल घेतली आणि त्यांना नव्याने उपस्थित राहण्याची संधी देण्याचे आदेश दिले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टानं हे आदेश रद्द करत लवकरात लवकर NEET परीक्षेचा निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत.

First published:

Tags: Entrance exam, Exam result