Success Story: गावातल्या सरकारी शाळेत शिकून आईविना मोठी झालेली सौम्या अशी झाली न्यायाधीश

Success Story: गावातल्या सरकारी शाळेत शिकून आईविना मोठी झालेली सौम्या अशी झाली न्यायाधीश

कठोर मेहनत केली तर सगळं शक्य आहे. हे फक्त एक वाक्य नाही. या एका छोट्याशा वाक्यात कितातरी मोठा विश्वास आहे. हाच विश्वास दिनेश द्विवेदी यांना त्यांची मुलगी सौम्या द्विवेदीवर होता. सौम्याने तो विश्वास सार्थ करून दाखवला आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जुलै : कठोर मेहनत केली तर सगळं शक्य आहे. हे फक्त एक वाक्य नाही. या एका छोट्याशा वाक्यात कितातरी मोठा विश्वास आहे. हाच विश्वास दिनेश द्विवेदी यांना त्यांची मुलगी सौम्या द्विवेदीवर होता. सौम्याने तो विश्वास सार्थ करून दाखवला आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.

सौम्याने धनौटी गावातल्या कस्तुरबा गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. तिच्या आईचं दहा वर्षांपूर्वीच निधन झालं. त्यानंतर तिला सांभाळलं ते वडिलांनीच. सौम्याच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. तिच्या वडिलांचं स्वप्न होतं, आपल्या धाकट्या मुलीने न्यायाधीश व्हावं. सौम्याला तिच्या वडिलांसारखंच शिक्षक व्हायचं होतं पण तिने वडिलांच्या स्वप्नाचा आदर करत त्या दिशेनं पावलं उचलली.

(पाहा :  VIDEO: ऑनलाईन ऑर्डर करताय सावधान! तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक)

सौम्याने 12 वी उत्तीर्ण केल्यानंतर एलएलबीसाठी बनारस हिंदू विश्वविद्यालयात अर्ज दाखल केला. आता ती बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतूनच एलएलएम करते आहे. हा अभ्यास करताना तिने यूपीएससीची परीक्षाही दिली. या परीक्षेत तिने 151 वी रँक मिळवली.

(पाहा :VIDEO : सेलिब्रिटींना नाचवणारे शूज येतात धारावीतल्या या कारखान्यातून)

वडिलांचं स्वप्न पूर्ण

सौम्या म्हणते, माझ्या वडिलांनी जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण करून मी न्यायाधीश बनले आहे. या अभ्यासात मी सोशल मीडियापासून दूर राहिले. त्यामुळे मला एकाग्रतेने अभ्यास करता आला. तिला आता आयपीआर किंवा आर्बिटेशन लॉ मध्ये करिअर करायचं आहे. आपल्या देशाची न्यायसंस्था चांगली आहे. ही प्रक्रिया सदोष नाही पण कायद्याची अमलबजावणी चांगल्या पद्धतीने व्हायला हवी, असं तिला वाटतं. म्हणूनच कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्याला सौम्याचं प्राधान्य असणार आहे.

=========================================================================

अजित पवारांच्या संतापावर सचिन अहिर बोलले, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 08:00 AM IST

ताज्या बातम्या