Home /News /career /

पालकांनो, मुलांसाठी Career निवडताना त्यांना अशा पद्धतीनं करा मदत; भविष्यात होतील यशस्वी

पालकांनो, मुलांसाठी Career निवडताना त्यांना अशा पद्धतीनं करा मदत; भविष्यात होतील यशस्वी

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Career Tips in Marathi) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही आपल्या पाल्यांना योग्य करिअर निवडण्यात नक्कीच मदत करू शकाल.

    मुंबई, 17 मे: कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आणि कोणत्या क्षेत्रात अधिक स्कोप (Career Scope after 12th) आहे हे आजकाल मुलांना सांगण्याची गरज पडत नाही. मुलं आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर (How to do career) करतात. मात्र असेही काही मुलं असतात जे बारावीनंतर किंवा ग्रॅज्युएशननंतर (Career after graduation) नक्की कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं हे ठरवू शकत नाही. यामुळे पालक मात्र चिंतेत असतात. अनेकदा पालकही मुलांना त्यांच्या आवडीच्या नसलेल्या क्षेत्रात Career करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे मुलं टेन्शन घेतात. पण आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Career Tips in Marathi) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही आपल्या पाल्यांना योग्य करिअर (How to help children to select right career option) निवडण्यात नक्कीच मदत करू शकाल. तसंच त्यांना यशस्वी (Success tips for children) होताना बघाल. चला तर जाणून घेऊया यासाठीच्या काही टिप्स. नुकतीच राज्यात बारावीची परीक्षा संपली आहे. यानंतर लाखो विद्यार्थी महाविद्यालयात (Career Tips) प्रवेशासाठी अर्ज करतील. पालकांची इच्छा असल्यास, ते आपल्या मुलांना सर्वोत्तम करिअर पर्याय (career options for 12th students) निवडण्यात मदत करू शकतात. म्हणूनच आज पालकांसाठी काही टिप्स जाणून घेऊया. क्या बात है! कमी वेळात जास्त पैसे कमवण्याची संधी देतील 'हे' Part Time Jobs मुलांची आवड समजून घ्या मुलांना करिअरचा सल्ला देण्यापूर्वी त्यांची आवड जाणून घ्या. त्यांच्या आवडत्या विषयांबद्दल त्यांच्याशी बोला. तसेच त्यांना भविष्यात काय करायचे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मुलांना अनेक पर्याय द्या प्रत्येक मूल दुसऱ्यापेक्षा वेगळे असते. तुमच्या मुलाची आवड आणि व्यक्तिमत्व समजून घेऊन करिअरचे अनेक पर्याय त्याच्यासमोर ठेवा. हे त्याला सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत करू शकते. करिअर काउन्सिलर करतील मदत जर तुमच्या मुलाला करिअरचा पर्याय निवडताना जास्त त्रास होत असेल, तर तुम्ही त्याला करिअर कौन्सिलरकडे घेऊन जा. यातून त्याला तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. प्राध्यापकांनो, नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका; 'या' कॉलजेमध्ये 25 जागांसाठी Jobs करू शकतात बिझिनेस आजकाल अनेक तरुण स्टार्टअप्सकडे खूप रस दाखवत आहेत. तुमच्या मुलाला त्याच्या स्वारस्याबद्दल देखील विचारा. जर त्याला भविष्यात व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर त्याच्याशी संबंधित कोर्स करा.
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, School children, Success

    पुढील बातम्या