Home /News /career /

Success Story: CAT परीक्षेत पुण्याच्या यशनं केली कमाल; पहिल्याच प्रयत्नात मिळवले 99.99 पर्सेंटाइल; वाचून वाटेल अभिमान

Success Story: CAT परीक्षेत पुण्याच्या यशनं केली कमाल; पहिल्याच प्रयत्नात मिळवले 99.99 पर्सेंटाइल; वाचून वाटेल अभिमान

न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत यशनं आपल्याला मिळालेल्या यशामागचं रहस्य सांगितलं.

न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत यशनं आपल्याला मिळालेल्या यशामागचं रहस्य सांगितलं.

आपल्या या यशाचे श्रेय त्यानं आपल्या कुटुंबाला दिलं असून सहा महिने तो या परीक्षेची तयारी करत असताना त्याच्या घरच्यांनी खंबीर पाठिंबा दिल्याचं त्यानं सांगितलं.

    मुंबई, 05 जानेवारी: देशातील नामांकित आयआयएम (IIM)अर्थात व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात कॅट (CAT) परीक्षेत मुंबई आयआयटीच्या (IIT Bombay) यश मंधाना (Yash Mandhana) या विद्यार्थ्यांनं 99.99 पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यानं पहिल्याच फटक्यात या अत्यंत कठीण परीक्षेत यश (Success Story) मिळवलं आहे. मूळचा पुण्याचा असलेला 22 वर्षीय यश मुंबई आयआयटीमध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षालाआहे. त्यानं कॅटसारखी अत्यंत अवघड परीक्षा अगदी सहजपणे उत्तीर्ण केल्यानं अनेकांना त्याच्या या देदीप्यमान कामगिरीमागचं रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत यशनं आपल्याला मिळालेल्या यशामागचं रहस्य सांगितलं. आपल्या या यशाचे श्रेय त्यानं आपल्या कुटुंबाला दिलं असून सहा महिने तो या परीक्षेची तयारी करत असताना त्याच्या घरच्यांनी खंबीर पाठिंबा दिल्याचं त्यानं सांगितलं. यशचे वडील केमिकल इंजिनिअर असून, आई गृहिणी आहे. आपली अभ्यासाची पद्धत उलगडून सांगताना तो म्हणाला, ' दररोज फक्त दोन तास मी या परीक्षेसाठी अभ्यास करत असे. मात्र मी जेईई मेन्स, अॅडव्हान्स आणि इतरही स्पर्धात्मक परीक्षा दिल्यानं मला याची तयारी करणं सोपं गेलं. मी अनेक ऑलिम्पियाडसमध्येही सहभागी झालो होतो. त्यामुळे मला या परीक्षेसाठी तयारी करणं आवघड वाटलं नाही. ' मोठी बातमी! भारतात कधी पासून सुरु होणार चार दिवसांचा आठवडा? अखेर उत्तर मिळालं या परीक्षेची तयारी करताना आपण सर्वांत जास्त भर मॉक टेस्टवर (How to give Mock Tests) दिल्याचंही त्यानं स्पष्ट केलं. काही दिवस दररोजचे दोन तास फक्त मॉक टेस्टची तयारी करण्यासाठी दिल्याचं त्यानं सांगितलं. नंतर उर्वरित दिवसांत त्यानं रोज दोन तासाचा वेळ पेपर सोडवणे आणि मॉक टेस्टचं विश्लेषण करण्यासाठी वापरला. अभ्यासासाठी कोणतंही ठरविक वेळापत्रक तयार केलं नव्हतं, मात्र दररोज अभ्यास करायचाच हे तत्व मात्र कटाक्षानं पाळल्याचं त्यानं सांगितलं. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्या प्रश्नाचं नीट विश्लेषण करून कशा पद्धतीनं उत्तरं लिहायची याचा विचार करून त्यातील आपल्याला चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत केल्याचं त्यानं नमूद केलं. मॉक टेस्टमध्ये काही वेळा कमी गुण मिळाले तरी घाबरून किंवा निराश न होता, सतत सराव कायम ठेवावा असंही त्यानं सांगितलं. तसंच अभ्यासाचा ताण दूर करण्यासाठी आपल्या छंदाचा वापर करावा, असं त्यानं आवर्जून सांगितलं. व्यायाम आणि फॉर्म्युला वन रेसिंग कारची आवड असलेल्या यशनं आपल्या अभ्यासाच्या काळातही आपले हे छंद कायम ठेवले होते. यामुळे मन ताजेतवाने होते, मानसिक ताण कमी होतो परिणामी अभ्यासही चांगला होतो असं त्यानं स्पष्ट केलं. कॅटसारखी अत्यंत अवघड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण आणि चिकटीनं अभ्यास केला पाहिजे असा सल्लाही यशनं दिला आहे. काय सांगता! 'या' विद्यापीठात दिलं जातंय Party करण्याचं शिक्षण, प्रवेशासाठी झुंबड नियमित अभ्यासाच्या बळावर हे अभूतपूर्व यश मिळवणाऱ्या यशनं अनेक विद्यार्थ्याना प्रेरणा दिली आहे. यश त्याच्या पुढील शिक्षणासाठी अहमदाबाद, बेंगळूरू किंवा कोलकाता इथल्या आयआयएममध्ये प्रवेश घेण्याचा विचार करत आहे. तो आता पुढील फेऱ्याची तयारी करत आहे.
    First published:

    Tags: Cat, Exam, IIT, Pune, Success story

    पुढील बातम्या