मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: अवघ्या 21 वर्षांच्या वयात 'तिनं' क्रॅक केली UPSC परीक्षा; लातूरच्या लेकीनं उंचावली महाराष्ट्राची मान

Success Story: अवघ्या 21 वर्षांच्या वयात 'तिनं' क्रॅक केली UPSC परीक्षा; लातूरच्या लेकीनं उंचावली महाराष्ट्राची मान

 ज्या वयामध्ये काही विद्यार्थी पदवीही घेऊ शकत नाहीत अशा वयात तिनं संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावेल अशी कामगिरी करून दाखवली आहे.

ज्या वयामध्ये काही विद्यार्थी पदवीही घेऊ शकत नाहीत अशा वयात तिनं संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावेल अशी कामगिरी करून दाखवली आहे.

ज्या वयामध्ये काही विद्यार्थी पदवीही घेऊ शकत नाहीत अशा वयात तिनं संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावेल अशी कामगिरी करून दाखवली आहे.

लातूर, 25 सप्टेंबर: UPSC ची परीक्षा (UPSC Exam result) म्हंटलं की भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. जगातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा म्हणून UPSC ची ओळख. मात्र काही विद्यार्थी असेही असतात जे आपल्या परिश्रमांमुळे आणि यशसंपादन (Success story of UPSC) करण्याच्या जिद्दीमुळे गगनभरारी घेतात. लातूरच्या लेकीनंही काहीसं असंच काम करून दाखवलं आहे. ज्या वयामध्ये काही विद्यार्थी पदवीही घेऊ शकत नाहीत अशा वयात तिनं संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावेल (Inspirational story of UPSC) अशी कामगिरी करून दाखवली आहे. अवघ्या 21 वर्षांच्या वयात तिनं UPSC ची परीक्षा उत्तीर्ण (UPSC success story of Nitisha Jagptap from Maharashtra) केली आहे.

नितीशा जगताप (Nitisha Jagtap) असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. विशेष म्हणजे नितीशानं UPSC ची परीक्षा पास करण्याची कामगिरी पहिल्याच प्रयत्नात (Nitisha UPSC AIR Rank) केली आहे. संपूर्ण देशभरातून तिनं 199 वा रँक प्राप्त केला आहे. जिथे इतर विद्यार्थ्यांना अनेक प्रयत्न करूनही UPSC कठीण जाते तिथे नितीशानं ही विलक्षण कामगिरी करत यश संपादन केलं आहे.

मोठं होऊन सरकारी नोकरी (Government Jobs) करायची आणि मोठं ऑफिसर होण्याचं स्वप्न नितीशानं लहानपणापासूनच बघितलं होतं. त्यामुळे तिनं रस्ताही प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवली होती. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून तिनं शिक्षण पूर्ण केलं. तिच्या शिक्षणासाठी तिची आईसुद्धा पुण्यात तिच्याजवळ राहायला आली होती. शिक्षणानंतर नितीशानं प्रचंड मेहनत केली. UPSC क्रॅक करण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली आणि अखेर तिनं तिचं स्वप्नं पूर्ण केलं.

हे वाचा - सहावीत असताना घडलेली घटना ठरली टर्निंग पॉइंट; बदललं IAS टॉपर शुभम कुमारचं आयुष्य

कसा केला अभ्यास?

बहुतांश विद्यार्थी ग्रॅज्युएशननंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागतात. मात्र नितीशानं तसं केलं नाही. तिनं शिक्षण घेत असतानाच दुसऱ्या वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची सुरुवात केली होती. त्यामुळे तिच्या हातात अभ्यास करण्यासाठी बराच काळ होता. तसंच तिच्या मनात असलेल्या जिद्दीमुळे तिला हे सर्व करणं अगदी सोपं झालं. चार वर्षांच्या अभ्यासात तिनं संपूर्ण अभ्यास अगदी प्लॅनिंगपूर्वक आणि सहजरित्या केला असं ती सांगते.

विलक्षण अनुभव

UPSC ची परीक्षा झाल्यानंतर माझी मुलाखत होती. यावेळी मुलाखत देणं मला फारसं कठीण गेलं नाही. त्यांनी विचारलेल्या बऱ्याच प्रश्नही उत्तरं मी आत्मविश्वासानं दिली आणि ज्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती त्याबद्दल मी स्पष्ट सांगितलं असं नितीशा सांगते.

हे वाचा - Big News :Civil Services Main 2020 Result: UPSC मुख्य परीक्षेच्या निकालाची घोषणा

एकूणच काय तर ज्या वयात इतर विद्यार्थी कॉलजेच्या कट्ट्यावर बसून हसत-खेळत असतात त्या वयामध्ये नितीशानं मिळवलेलं हे यश विलक्षण आहे. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीसाठी संपूर्ण देशभरातून तिचं कौतुक होत आहे. यापुढेही आपल्या कामामुळे नागरिकांचं भलं करण्याचं तिचं स्वप्न आहे.

First published:

Tags: Latur, Pune, Success, Success stories, Upsc exam