मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: कधीकाळी रिक्षा चालवणारा विद्यार्थी IES परीक्षेत आला दुसरा; वाचा त्याचा प्रेरणादायी प्रवास

Success Story: कधीकाळी रिक्षा चालवणारा विद्यार्थी IES परीक्षेत आला दुसरा; वाचा त्याचा प्रेरणादायी प्रवास

भारतीय आर्थिक सेवा (Indian Economic Services-IES) या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

भारतीय आर्थिक सेवा (Indian Economic Services-IES) या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

भारतीय आर्थिक सेवा (Indian Economic Services-IES) या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

श्रीनगर (जम्मू-काश्मिर), 01 ऑगस्ट: ज्याच्या अंगी काही करून दाखवण्याची जिद्द असते तो जगही जिंकू शकतो असं म्हणतात. मात्र असे खूप कमी विद्यार्थी असतात जे कठीण परिस्थितीतून मार्ग काढत यशाच्या उंच शिखरावर पोहोचतात. असाच एक विद्यार्थी आहे जम्मू- काश्मीर (Jammu Kashmir) या केंद्रशासित प्रदेशमधील श्रीनगरचा तनवीर अहमद खान. तनवीरनं संघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा आयोजित प्रतिष्ठित भारतीय आर्थिक सेवा (Indian Economic Services-IES) या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, श्रीनगरपासून (Shrinagar) सुमारे 80 किमी दूर असलेल्या दुर्गम निगिनपोरा कुंड गावात राहणारा तन्वीर अहमद खान यानं आपलं प्राथमिक शिक्षण शासकीय प्राथमिक शाळा कुंड आणि नंतर शासकीय हायस्कूल वाल्टेनगू इथून पूर्ण केलं. त्यानंतर त्यानं शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय, राजलू कुंड येथून 12वी आणि 2016 मध्ये शासकीय पदवी महाविद्यालय अनंतनाग इथून कला पदवी पूर्ण केली.

काश्मीर विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत तृतीय क्रमांक मिळवून आणि अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवून तन्वीर अहमद खान सुरुवातीपासूनच एक गुणवंत विद्यार्थी आहे. तन्वीरनं त्याच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षादरम्यान जुनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) मिळवून आणखी एक मैलाचा दगड गाठला होता.

हे वाचा - SBI Recruitment 2021: लवकरच होणार परीक्षा; जाणून घ्या कशी असेल निवड प्रक्रिया

एम.फिलची पदवी एप्रिल 2021 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज, कलकत्ता इथून प्राप्त केली. यादरम्यान तन्वीरनं हिवाळ्यात कोलकातामध्ये पार्ट टाइम रिक्षाचालक म्हणूनही काम केलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती लक्ष केंद्रित करतो, कठोर परिश्रम करतो तेव्हा यश मिळतं आणि काहीही अशक्य नसतं.

“कोविड कालावधीत, मी स्वतःला माझ्या खोलीच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त केलं आणि एम.फिल करत असताना IES परीक्षेची तयारी सुरू केली. मी कोविडचा माझ्या अभ्यासाच्या वेळापत्रकावर कधीही परिणाम होऊ दिला नाही.” पहिल्याच प्रयत्नातच ही कामगिरी केली आहे. तो म्हणाला की हा एक चढाचा संघर्ष आहे, परंतु त्याने कधीही आशा सोडली नाही. तन्वीरनं पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवल्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

First published:

Tags: Career opportunities, Jammu and kashmir, Success story