Home /News /career /

Success Story: आई-वडील मजूर तर स्वतः विकली भाजी; अखंड परिश्रमानं शिवाकांत झाले सिव्हिल जज

Success Story: आई-वडील मजूर तर स्वतः विकली भाजी; अखंड परिश्रमानं शिवाकांत झाले सिव्हिल जज

शिवकांत कुशवाहा

शिवकांत कुशवाहा

आई शेतीत मजुरीचे काम तर वडील शेतकरी असताना स्वतः भाजी विकून सिव्हिल जज होण्यापर्यंतची त्यांची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत.

  मुंबई, 03 मे: जर मनात काही आशा आकांशा असतील आणि त्या पूर्ण करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी त्यांनी जग जिंकून दाखवलं आहे. अशीच एक यशोगाथा (Success Story) आहे शिवकांत कुशवाहा (Success Story of Shivkant Kushwaha) यांची. आई शेतीत मजुरीचे काम तर वडील शेतकरी असताना स्वतः भाजी विकून सिव्हिल जज होण्यापर्यंतची त्यांची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. अमरपाटण तालुक्यातील शिवकांत हे पूर्वी भाजीपाला विकायचे. आता त्यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने कोणतेही प्रशिक्षण घेतले नसून स्वयंअध्ययनातून यश संपादन केले आहे. त्यांनी ओबीसी प्रवर्गात संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. दिवाणी न्यायाधीश झाल्याची बातमी समजताच संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. लोकांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. Engineer उमेदवारांनो, पुण्यातील 'या' नॅशनल सेंटरमध्ये नोकरीची मोठी संधी
  शिवकांत कुशवाह यांचे कुटुंब आजही कच्च्या घरात राहत राहतात.. त्यांचे वडील मजूर आहेत. आर्थिक चणचण असतानाही त्यांनी कष्ट करून कुटुंबाचे पालनपोषण केले. त्याची आईही घर चालवण्यासाठी काम करायची. शिवकांतला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. तो दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आहे. त्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची प्रचंड इच्छा होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी भाजीचा गाडा उभा केला. मात्र त्यांनी परिस्थिती समोर हार मानली नाही आणि सिव्हिल जज झाले.
  आईच्या निधनानंतर परिस्थितीशी दिली झुंज दिवाणी न्यायाधीश झालेल्या शिवकांतचे वडील की लाल कुशवाह यांची छोटीशी शेती आहे. ते येथे भाजीपाला पिकवतात आणि विकतात. संघर्षाच्या दिवसांत तोही वडिलांसोबत भाजीच्या गाड्यावर बसायचा. आईच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची अवस्था बिकट झाली. शिवकांतला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्यांनी आपल्या कारकिर्दीत कधीच अडसर होऊ दिली नाही. एवढेच नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो उसाच्या रसाचा गाडाही लावायचा. Interview Tips: 'या' अक्षम्य चुकांमुळे हातून जाऊ शकतो जॉब; आताच घ्या काळजी
  असं मिळालं यश
  शिवकांत चार वेळा अपयशी ठरला, तरीही त्याने हार मानली नाही. त्याला पाचव्या प्रयत्नात यश मिळाले आणि त्याने ओबीसी प्रवर्गात दुसरे स्थान मिळविले. तो सांगतो की इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने दररोज 12 तास अभ्यास केला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण अमरपाटण येथेच केले. त्यानंतर रीवा येथून एलएलबी केले. त्यानंतर अभ्यासासोबत कोर्ट प्रॅक्टिस करून न्यायाधीशांच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि मेहनतीने यश संपादन केले.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Mp, Success story

  पुढील बातम्या