Home /News /career /

Success Story : MBA चं काय जमेना म्हणून चहाचा स्टॉल चालू केला; 22 वर्षीय तरुण आहे आता करोडपती

Success Story : MBA चं काय जमेना म्हणून चहाचा स्टॉल चालू केला; 22 वर्षीय तरुण आहे आता करोडपती

Success Story - प्रफुल्ल आयआयएम अहमदाबादला शिक्षणासाठी गेला. तेथे त्यानं सलग तीन वर्षे कॉमन अॅडमिशन टेस्ट (सीएआयटी) ची तयारी करूनही तो कॅट परीक्षा पास होऊ शकला नाही. त्यामुळं त्यानं मग चहाचं दुकान सुरू केलं आणि त्याला नाव दिलं - 'MBA चायवाला'.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : टॉप आयआयएममधून व्यवसाय आणि उद्योजकता शिकणे हे लाखो युवकांचे स्वप्न असतं. यासाठी दरवर्षी अनेक विद्यार्थी कॅट, एक्सएटी आणि मॅटसह एमबीए प्रवेश परीक्षेत बसतात. एका शेतकऱ्याचा मुलगा प्रफुल्ल बिल्लोरनेही हेच स्वप्न पाहिलं होतं. प्रफुल्ल आयआयएम अहमदाबादला शिक्षणासाठी गेला. तेथे त्यानं सलग तीन वर्षे कॉमन अॅडमिशन टेस्ट (सीएआयटी) ची तयारी करूनही तो कॅट परीक्षा पास होऊ शकला नाही. त्यामुळं त्यानं मग चहाचं दुकान सुरू केलं आणि त्याला नाव दिलं - 'MBA चायवाला'. आज, MBA चायवालाची देशभरात 22 पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत आणि आता लवकरच एक आंतरराष्ट्रीय आउटलेट सुरू केलं जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या प्रफुल्ल करोडपती आहे. जाणून घेऊया त्याची यशोगाथा... अहमदाबादमधून प्रवास सुरू प्रफुल्ल बिल्लोर हा मध्य प्रदेशातील धारच्या एका छोट्या लाब्रावडा गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगा. त्याला आयआयएम अहमदाबादमधून एमबीए करायचे होते, पण काही केल्या यश मिळत नव्हतं. त्यामुळे तो दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे वळला पण अहमदाबादमध्येच राहायला त्याला आवडत होतं. प्रफुल्लला अहमदाबाद शहर इतके आवडले की त्याने तिथे स्थायिक होण्याचा विचार सुरू केला. मात्र, येथे राहण्यासाठी, जगण्यासाठी त्याला पैशाची गरज होती आणि आता पैशासाठी काहीतरी करावं लागेल, असा विचार करून प्रफुल्लने अहमदाबादच्या मॅकडोनाल्डमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. येथे प्रफुल्लला 37 रुपये प्रति तास या दराने पगार मिळत असे आणि तो दिवसाला सुमारे 12 तास काम करत असे. चहाच्या दुकानाने प्रफुलचे जग बदलले काम करत असताना प्रफुल्लला समजले की, तो आयुष्यभर मॅकडोनाल्डची नोकरी करू शकत नाही. यातून तो फार पैसे कमावू शकणार नव्हता आणि वेळही खूप जात होता. म्हणून त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. पण व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रफुल्लकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत प्रफुल्लने असा व्यवसाय करण्याचा विचार केला ज्यात भांडवलही कमी असेल आणि तो सहज करता येईल. येथूनच चहाचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना त्याच्या मनात आली. हे काम सुरू करण्यासाठी प्रफुल्ल सुरुवातीला त्याच्या वडिलांशी खोटं बोलला आणि अभ्यासाच्या नावावर 10 हजार रुपये मागितले. या पैशातून प्रफुल्लने चहाचा स्टॉल उभारण्यास सुरुवात केली. हे वाचा - Sunny Leone daughter: 6 वर्षांची झाली सनी लियोनीची निशा; वाढदिवसानिमित्त शेअर केले CUTE फोटो आज MBA चायवाला हा एक ब्रँड बनला आहे. देशातील 22 मोठ्या शहरांमध्ये त्याचे आउटलेट आहेत आणि आता फ्रँचायझी परदेशातही उघडणार आहे. प्रफुल्ल बिल्लोरे म्हणतो की, त्याच्या कुटुंबानं त्याला खूप पाठिंबा दिला आहे, त्याचा विश्वास आहे की जर तुम्ही कोणत्याही कामासाठी मनापासून परिश्रम घेत असाल तर यश नक्कीच मिळते. हे वाचा - बर्थ डे पार्टीला बोलावून महिला डॉक्टरवर बलात्कार; एम्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरचं धक्कादायक कृत्य आता देशभर त्याचं कौतुक होतंय प्रफुल्लच्या यशामुळे त्याची खिल्ली उडवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं, प्रफुल्ल म्हणाला की आता लोक मला सल्ला विचारतात. मी त्यांना सांगतो, तुमची पदवी कोणती आहे, शिक्षण काय आहे यानं काही फरक पडत नाही. मला जे आवडते ते मी करतो. प्रफुल्लने एमबीए सोडले आणि चहाचा स्टॉल चालू केला. चहाचा व्यवसाय सुरू केल्याच्या 4 वर्षात त्याने 3 कोटी रुपये कमावले आणि देशभरात त्याचं कौतुक झालं. प्रफुल्ल बिल्लारे यांचे दुकान MBA चायवाला आज तरुणांमध्ये लोकप्रिय ब्रँड बनला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या