मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: परदेशातून पुण्यात येऊन सांभाळला वडिलांचा बिझनेस; उभी केली 6000 कोटींची कंपनी

Success Story: परदेशातून पुण्यात येऊन सांभाळला वडिलांचा बिझनेस; उभी केली 6000 कोटींची कंपनी

नमिता थापर

नमिता थापर

मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या नमिता थापर (Namita Thapar) या आज एक अत्यंत यशस्वी महिला उद्योजक म्हणून ओळखल्या जातात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 23 ऑक्टोबर: नवउद्योजकांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सध्या सोनी टीव्हीवर सुरू करण्यात आलेला 'शार्क टँक इंडिया' नावाचा रिअॅलिटी शो चर्चेत होता. या शोमध्ये जज म्हणून काही यशस्वी उद्योजक आहेत. त्यातलं एक लोकप्रिय झालेलं नाव आहे ते म्हणजे नमिता थापर.

पुण्यातल्या एमक्युअर फार्मा या औषध उत्पादन कंपनीच्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या नमिता थापर (Namita Thapar) या आज एक अत्यंत यशस्वी महिला उद्योजक म्हणून ओळखल्या जातात. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या नमिता थापर यांची ही झेप थक्क करणारी आहे. नमिता यांना लहानपणापासूनच बिझनेसवूमन व्हायचं होतं. आपलं हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी व्यवसायाबद्दल सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला अक्षरश: झोकून दिलं. त्यांच्या या अथक मेहनतीला यश आलं आणि एमक्युअर फार्मा ही आज 6000 कोटींची उलाढाल करणारी कंपनी उभी राहिली.

Success Story: मित्रांकडून 500 रुपये कर्ज घेऊन त्यांनी सुरु केली कंपनी; आज आहेत कोट्यवधींचे मालक

21 मार्च 1977 रोजी पुण्यात जन्मलेल्या नमिता थापर यांनी ICAI मधून चार्टर्ड अकाउंटंट (CA) म्हणून पदवी प्राप्त केल्यानंतर एमबीए करण्यासाठी त्या ड्यूक विद्यापीठाच्या फ्युकुआ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये गेल्या. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, एमबीए झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या (USA) बड्या कंपन्यांमध्ये काम केलं. गाईडंट कॉर्पोरेशनमध्ये त्यांनी सहा वर्षं वित्त आणि विपणन क्षेत्रातल्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यानंतर 2007 मध्ये त्या पुण्यात परत आल्या आणि त्यांनी एमक्युअर फार्मामध्ये काम करण्यास सुरुवात केली. कंपनीच्या विकासासाठी त्यांनी अनेक नवनवीन कल्पना राबवल्या. आर्थिक नियोजन, मनुष्यबळ पुरवठा आणि मार्केटिंग यावर लक्ष केंद्रित केलं. त्याचा परिणाम लवकरच दिसून आला. आज कंपनी देशभरातल्या 3000 हून अधिक वैद्यकीय प्रतिनिधींचं व्यवस्थापन करते. याद्वारे 1 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते.

त्यांच्या कामात त्यांचे पती विकास थापर यांची पुरेपूर साथ असून, वीर आणि जय अशी दोन मुलंही त्यांना आहेत. नमिता यांना त्यांच्या आई-वडिलांनीही नेहमीच पाठिंबा दिला आहे. नमिता थापर या फिनोलेक्स केबल्स आणि फ्युकुआ स्कूल ऑफ बिझनेसच्या संचालक मंडळावर असून, 11 ते 18 वयोगटातल्या मुलांना उद्योजकता शिकवणाऱ्या Incredible Ventures Limited या कंपनीच्या संस्थापक आणि सीईओदेखील आहेत.

Success Story: बाळाला एकही प्रोडक्ट नव्हतं होत सूट; आईला आला राग अन् सुरु केला बिनझेस; आज 100 कोटींची उलाढाल

मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, पुणे, चेन्नई आणि हैदराबाद इथं या कंपनीच्या शाखा आहेत. पुण्याच्या यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशनच्या सदस्या असलेल्या नमिता थापर यांना इकॉनॉमिक टाइम्स 2017च्या वूमेन अहेड लिस्टमधून '40 अंडर फॉर्टी' पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ऑफ चेंज' कार्यक्रमाचाही त्या भाग आहेत.

व्यावसायिक म्हणून अत्यंत यशस्वी असणाऱ्या नमिता थापर स्त्री म्हणून अत्यंत खंबीर असून, महिलांनी स्वत:ला कधीही कमकुवत समजू नये आणि मदत घेण्यास घाबरू नये, असं त्या सांगतात. 'नोकरी, व्यवसाय करणारे पुरुष नेहमी घरातल्या बायकांना 'हे करा, ते करा' अशी कामं सांगतात. मग नोकरी, व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया पुरुषांना काम करण्यास सांगण्यास किंवा घरात मदत करण्यास का बिचकतात? महिलांनी कधीही मदत मागायला घाबरू नये. परंतु मदत मागणं आणि परवानगी मागणं यातला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. मदत मागितली म्हणजे आपण दुर्बल ठरू असं वाटत असेल तर ते योग्य नाही. तुम्ही सुपरवुमन नाही आहात, तर काही हरकत नाही, आपल्यापैकी बहुतांश स्त्रिया अशाच आहेत. तुमच्यात काही कमतरता असणं आणि तुम्ही मदत मागणं यात काहीही गैर नाही,' असा सल्ला त्या महिलांना देतात.

First published:

Tags: Career, Career opportunities, Digital prime time, Success stories, Success story