मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: हॉटेलमध्ये वेटरचं काम करताना दिली परीक्षा; 7व्या प्रयत्नात पास केली UPSC; झाले IAS अधिकारी

Success Story: हॉटेलमध्ये वेटरचं काम करताना दिली परीक्षा; 7व्या प्रयत्नात पास केली UPSC; झाले IAS अधिकारी

जयगणेश आज आयएएस अधिकारी

जयगणेश आज आयएएस अधिकारी

तमिळनाडूमधल्या जयगणेश (Jaiganesh) यांची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा जयगणेश यांचा प्रवास सोपा नव्हता.

  मुंबई, 20 जुलै:  जीवनात यश, पद-प्रतिष्ठा मिळावी, असं प्रत्येक युवकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही युवक कठोर परिश्रम करतात. यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) अत्यंत अवघड मानली जाते. परंतु, प्रशासकीय अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारे युवक प्रयत्नांची पराकाष्ठा करून ही परीक्षा देतात. यात काही युवकांना यश मिळतं, तर काही जण अपयशी होतात. वारंवार अपयश पदरात येऊनही काही युवक पुन्हा प्रयत्न करत राहतात. कठीण परिस्थितीवर मात करून आयएएस, आयपीएस अधिकारी होणारे हे युवक समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. तमिळनाडूमधल्या जयगणेश (Jaiganesh) यांची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा जयगणेश यांचा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणींवर मात करून जयगणेश यांनी यश संपादन केलं आहे. कधी काळी वेटरची (Waiter) नोकरी करणारे जयगणेश आज आयएएस अधिकारी (IAS Officer) झाले आहेत. `टीव्ही नाइन हिंदी`ने त्यांच्याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तमिळनाडू (Tamil Nadu) राज्यातले आयएएस अधिकारी जयगणेश यांचा प्रवास खूप खडतर होता. जीवनातल्या अनेक अडचणींवर मात करून ते मोठ्या आत्मविश्वासाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची कहाणी अधिकारी होण्याचं स्वप्न बघणाऱ्या युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांनो, 'या' तारखा तुमच्यासाठी IMP; ऑफलाईन प्रवेश झाले सुरु
  जयगणेश यांनी यूपीएससीची परीक्षा सुमारे सहा वेळा दिली. कधी प्रीलिम्समध्ये तर कधी अंतिम परीक्षेत ते अनुत्तीर्ण होत होते. परीक्षेत वारंवार अपयश मिळाल्याने जयगणेश हताश झाले होते. त्यानंतर आपला खर्च भागवण्यासाठी त्यांनी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी पत्करली. नोकरीनंतर उरलेल्या वेळेत त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला. दरम्यान जयगणेश यांनी इंटेलिजन्स ब्युरोची (Intelligence Bureau) परीक्षा दिली. या परीक्षेत ते पास झाले. परंतु, त्या वेळी त्यांच्यासमोर एक गंभीर समस्या निर्माण झाली होती. नोकरीवर रुजू व्हावं की सातव्यांदा नागरी सेवा परीक्षा द्यावी, असं द्वंद्व त्यांच्या मनात निर्माण झालं. परंतु, आयएएसचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोच्या नोकरीवर पाणी सोडलं.
  तमिळनाडूच्या उत्तरेला अंबरजवळ एक छोटंसं गाव आहे. या गावात जयगणेश याचं प्राथमिक शिक्षण झालं. जयगणेश यांना चार भावंडं आहेत. भावंडांमध्ये ते ज्येष्ठ आहेत. जयगणेश अभ्यासात पहिल्यापासून हुशार होते. इयत्ता 12 वीला ते 91 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. 12वीनंतर त्यांना तांथी पेरियार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्रवेश मिळाला. या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं (Mechanical Engineering) शिक्षण घेतलं. इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यावर जयगणेश यांना एका कंपनीत नोकरी मिळाली. तिथं त्यांना दरमहा 2500 रुपये वेतन मिळत होतं. जयगणेश याचं नोकरीत मन लागत नव्हतं. या पगारात घरातले खर्च भागणार नाहीत, हे त्यांना समजत होतं. त्यामुळे त्यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेऊन अभ्यासाला सुरुवात केली आणि परीक्षादेखील दिली. इकडे तिकडे नोकरी शोधणं आता सोडा; पुणे महापालिकेत 448 पदांसाठी होतेय बंपर भरती सहा वेळा अपयशी ठरल्यानंतरही जयगणेश यांनी आत्मविश्वासाने सातव्यांदा नागरी सेवा परीक्षा (Civil Service Exam) दिली. विशेष म्हणजे त्या वेळी त्यांना यश मिळालं. या परीक्षेत त्यांना 156 वी रॅंक मिळाली. मेहनतीचं फळ मिळालं. स्वतःवर विश्वास असेल तर यश नक्की मिळतं, हे जयगणेश यांच्या वाटचालीवरून स्पष्ट होतं. त्यामुळे जयगणेश यांची ही कहाणी प्रेरणादायी आहे.
  First published:

  Tags: Ias officer, Success stories, Success story

  पुढील बातम्या