मराठी बातम्या /बातम्या /करिअर /बारावीत नापास झालेली मुलगी पहिल्याच प्रयत्नात झाली IAS अधिकारी, अंजू शर्माची प्रेरणादायी कहाणी

बारावीत नापास झालेली मुलगी पहिल्याच प्रयत्नात झाली IAS अधिकारी, अंजू शर्माची प्रेरणादायी कहाणी

अंजू शर्माची प्रेरणादायी कहाणी

अंजू शर्माची प्रेरणादायी कहाणी

बारावीत काही विषयात नापास झालेली अंजू शर्मा आज आयएएस अधिकारी आहे. 12वीत नापास होऊनही त्यांनी वयाच्या 22व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून यश संपादन केलं.

नवी दिल्ली 25 मे : नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत आणि संयम लागतो. हे कोणाचंही काम नाही. UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशीच एक कथा सांगणार आहोत, जी वाचल्‍यानंतर तुम्‍ही खूप प्रेरित व्हाल आणि तुमची अभ्यासाची आवड दाखवायला लागाल. बारावीत काही विषयात नापास झालेली अंजू शर्मा आज आयएएस अधिकारी आहे. 12वीत नापास होऊनही त्यांनी वयाच्या 22व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून यश संपादन केलं. बारावीच्या अपयशाचं रूपांतर त्यांनी आयुष्यातील यशात केलं.

अंजू शर्मा 12वीच्या परीक्षेत अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये नापास झाली होती आणि 10वीच्या केमिस्ट्रीमध्ये प्री-बोर्डमध्येही नापास झाली होती. मात्र, अंजू शर्माने इतर विषयांमध्ये डिस्टिंक्शन मिळवले. आयएएस अधिकारी अंजू शर्मा म्हणाल्या की, तुमच्या अपयशासाठी तुम्हाला कोणीही लक्षात ठेवत नाही, तर तुमच्या यशासाठी ठेवतं.

Maharashtra HSC Board Result: 'त्या' अतिरिक्त 10 मिनिटांचा विद्यार्थ्यांना फायदा होणार? कसा असेल यंदाचा निकाल

मात्र, त्यांच्या आयुष्यातील या दोन घटनांनीच त्यांचे भविष्य घडवले, असा त्यांचा विश्वास आहे. अंजू शर्मा एकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या, 'प्री-बोर्डच्या काळात मला खूप चॅप्टर्स वाचायचे होते आणि जेवणानंतर मला अभ्यास करायचा होता. मग मी घाबरू लागले कारण मी काहीही तयारी केली नव्हती आणि मला माहिती होतं, की मी नापास होणार आहे. माझ्या आजूबाजूच्या प्रत्येकाने 10 वी मधील मार्क्स किती महत्त्वाचे आहे यावर भर दिला, कारण त्यावर पुढचं भविष्य ठरतं.

या कठीण काळात अंजू शर्माच्या आईने तिचं सांत्वन केलं आणि हार न मानण्याची प्रेरणा दिली. शेवटच्या क्षणाच्या अभ्यासावर अवलंबून राहू नये हा धडाही त्यांनी शिकविला. त्यामुळे तिने सुरुवातीपासूनच कॉलेजच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यामुळे तिला कॉलेजमध्ये सुवर्णपदक मिळण्यात मदत झाली. त्यांनी जयपूरमधून बीएससी आणि एमबीए पूर्ण केलं. यामुळे अंजू शर्माला पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत झाली. तिने आधीच तिचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि आयएएस टॉपर्सच्या यादीत सामील झाली होती.

IAS अधिकारी अंजू शर्माने 1991 मध्ये राजकोटमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ती सध्या सरकारी शिक्षण विभाग (उच्च आणि तंत्रशिक्षण) सचिवालय, गांधीनगर येथे प्रधान सचिव आहे. त्यांनी गांधीनगरमध्ये जिल्हाधिकारी आणि भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी NRHM मध्ये तीन दशकांहून अधिक काळ सेवा दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Career Tips, Success Story