मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: अपघातात आईला गमावलं तरीही सोडली नाही जिद्द; IAS होण्याचं स्वप्नं केलं पूर्ण

Success Story: अपघातात आईला गमावलं तरीही सोडली नाही जिद्द; IAS होण्याचं स्वप्नं केलं पूर्ण

IAS होण्याचं स्वप्नं केलं पूर्ण

IAS होण्याचं स्वप्नं केलं पूर्ण

खडतर परिस्थितीवर मात करीत आयएएस ऑफिसर होण्याचं ध्येय प्रचंड मेहनत, जिद्द, अभ्यासवृत्ती या बळावर गाठलं. त्या आयएएस ऑफिसर म्हणजे अंकिता चौधरी.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 ऑक्टोबर:  देशभरातून लाखो विद्यार्थी यूपीएससी (UPSC) परीक्षा देतात; पण फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये यश मिळतं. यूपीएससी परीक्षा पास होणं तितकं सोपं नाही. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी खूपच खास आहे. कारण यामध्ये आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलीचा संघर्ष सांगणार आहोत, ज्या मुलीनं खडतर परिस्थितीवर मात करीत आयएएस ऑफिसर होण्याचं ध्येय प्रचंड मेहनत, जिद्द, अभ्यासवृत्ती या बळावर गाठलं. त्या आयएएस ऑफिसर म्हणजे अंकिता चौधरी. सध्या त्या सोनीपतच्या एडीसी म्हणून कार्यरत आहेत.

अंकिता चौधरी या मूळच्या हरियाणातल्या रोहतक शहरातल्या असून त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांचे वडील सत्यवान हे साखर कारखान्यात अकाउंटंट म्हणून काम करायचे, तर आई गृहिणी होती. त्या ज्या भागातून आल्या आहेत, त्या भागातल्या प्रत्येक मुलीला उच्च शिक्षण मिळत नाही; मात्र अशा संघर्षमय परिस्थितीमध्येही अंकिता चौधरी यांनी शिक्षण घेतलं. त्यांनी ग्रॅज्युएशन सुरू असतानाच यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी अभ्यासाशी तडजोड केली नाही आणि पोस्ट ग्रॅज्युएशननंतर यूपीएससीचा जोरदार अभ्यास सुरू केला.

IT Jobs: 'या' सर्वात मोठ्या आयटी कंपनीत फ्रेशर्स आणि विद्यार्थ्यांसाठीही जॉब्स; WFHचीही सुविधा 

असा आहे शैक्षणिक प्रवास

रोहतक इथल्या इंडस पब्लिक स्कूलमध्ये अंकिता चौधरी यांचं प्राथमिक शिक्षण झालं. बारावीनंतर त्यांनी दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन करीत असतानाच त्यांनी नागरी सेवेची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता; पण पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत यूपीएससी परीक्षेच्या तयारीला त्यांनी फारसा वेळ दिला नाही. आयआयटी दिल्लीतून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी स्वतःला यूपीएससी परीक्षेच्या तयारीत पूर्णपणे गुंतवलं.

IAS अधिकारी व्हायचंय? मग काय असतात जबाबदाऱ्या आणि अधिकार; इथे मिळेल संपूर्ण माहिती

पोस्ट ग्रॅज्युएशननंतरच त्यांनी यूपीएससी परीक्षा पहिल्यांदा दिली; पण त्यांना त्यात अपयश आलं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या परीक्षेची तयारी करीत असतानाच अंकिता यांच्या आईचा अपघाती मृत्यू झाला होता. यामुळे त्यांना मोठा धक्काच बसला; पण तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यानंतर पहिल्या प्रयत्नात परीक्षा देताना केलेल्या चुकांचं विश्लेषण करून त्यांनी दुप्पट मेहनतीनं यूपीएससीची तयारी सुरू केली.

2018 मध्ये यूपीएससी झाल्या उत्तीर्ण

दुसऱ्या प्रयत्नात अंकिता चौधरी यांनी 2018 मध्ये यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं. त्यांना देशात 14 वा क्रमांक मिळाला. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना त्या सांगतात, ‘अत्यंत प्रामाणिकपणे या परीक्षेची तयारी करा. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी योग्य रणनीती बनवणंदेखील आवश्यक आहे.’

First published:

Tags: Ias officer, Success, Success story