मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Success Story : वडिलांकडे नव्हते फीसाठी पैसे पण मुलाने UPSC मध्ये मिळवलं यश

Success Story : वडिलांकडे नव्हते फीसाठी पैसे पण मुलाने UPSC मध्ये मिळवलं यश

यूपीएससीमध्ये यश मिळवत IAS झालेल्या नुरूल हसनची कहाणी प्रेरणादायी आहे. एक काळ असा होता की नुरूलकडे फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. त्याच्या वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी जमीन विकली. आपल्या वडिलांना आपल्यासाठी एवढं करताना पाहून नुरूल हसनने निर्धार केला, काहीही करून आपल्या कुटुंबियांना या स्थितीतून बाहेर काढलंच पाहिजे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 31 जुलै : यूपीएससीमध्ये यश मिळवत IAS झालेल्या नुरूल हसनची कहाणी प्रेरणादायी आहे. एक काळ असा होता की नुरूलकडे फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. त्याच्या वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी जमीन विकली. आपल्या वडिलांना आपल्यासाठी एवढं करताना पाहून नुरूल हसनने निर्धार केला, काहीही करून आपल्या कुटुंबियांना या स्थितीतून बाहेर काढलंच पाहिजे. नुरुलचा जन्म उत्तर प्रदेशमधल्या पीलीभीतमधल्या एका छोट्याशा गावातला. त्याचे वडिल शेतकरी होते. त्याला दोन भाऊ असल्याने त्यांचं शिक्षण, पालनपोषण याची जबाबदारीही नुरूलवर होती.

या सगळ्या स्थितीत नुरूलने अभ्यासाचा ध्यास सोडला नव्हता. त्याने शाळेत पहिलं येत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. याच दरम्यान त्याच्या वडिलांना बरेलीमध्ये एक नोकरी मिळाली आणि नुरुलच्या कुटुंबाने तिथे स्थलांतर केलं. इथे तो बारावी झाला.

वैज्ञानिक ते IAS अधिकारी

बारावीनंतर त्याने अलीगढमधून बीटेक केलं पण त्याची फी भरायला पैसे नव्हते. यावर उपाय म्हणून त्याच्या वडिलांनी एक एकर जमीन विकली आणि फी भरली. त्याचवेळी नुरूलने नोकरी करतकरत भाभा अॅटॉमिक रिसर्च इन्स्टिटयूटची परीक्षा दिली आणि त्याची निवड वैज्ञानिक पदावर झाली.

(वाचा : 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार खूशखबर, 10 हजार रुपयांनी वाढणार पगार)

BARC मध्ये एक वर्षं पूर्ण केल्यानंतर त्याने आणखी पुढे जायचं ठरवलं आणि IAS ची तयारी सुरू केली. त्याने यूपीएससी परीक्षेत चांगलं यश मिळवलं. आज त्याने IAS बनून आपल्या कुटुंबाचं ऋण फेडलं आहे. नुरूल म्हणतो, प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता स्वत:वर विश्वास ठेवून पुढे जा. मग यश तुमचंच आहे.

=======================================================================================

VIDEO: मी गद्दार नाही, भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ भावुक!

First published:

Tags: Career, Upsc exam