Success story: कॉर्पोरेट नोकरी सोडून त्याने सुरू केली फुलशेती, आता लाखोंची कमाई

Success story: कॉर्पोरेट नोकरी सोडून त्याने सुरू केली फुलशेती, आता लाखोंची कमाई

तुम्हाला जर काही वेगळं करायची प्रबळ इच्छा असेल तर काही ना काही मार्ग निघतोच. उत्तर प्रदेशच्या रवि पाल यांनी हेच सिद्ध करून दाखवलं. त्यांनी लाखोंचं पॅकेज देणारी कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि फुलशेती सुरू केली.

  • Share this:

दिल्ली: तुम्हाला जर काही वेगळं करायची प्रबळ इच्छा असेल तर काही ना काही मार्ग निघतोच. उत्तर प्रदेशच्या रवि पाल यांनी हेच सिद्ध करून दाखवलं. त्यांनी लाखोंचं पॅकेज देणारी कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि फुलशेती सुरू केली.

एवढा लाखोंचा पगार देणारी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेणं हे त्यांच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. घरचे, मित्र आणि नातेवाईकांनी त्यांना खूप विरोध केला पण त्यांच्या विरोधाला न जुमानता रवि पाल यांनी आपला आतला आवाज ऐकला. त्यांच्या आत्मविश्वासामुळेच ते आता एक यशस्वी शेतकरी झाले आहेत.

रवि पाल सांगतात, 'मी 2011 मध्ये MBA केलं. त्यानंतर एल अँड टी आणि कोटक महिंद्रासारख्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली. पण याच वेळी मला वाटत होतं... काहीतरी राहून जातंय, कशाची तरी उणीव जाणवतेय...मी रोज विचार करायचो की मी आनंदी का नाहीये ? असं काय आहे जे माझा पिछा सोडत नाहीये ?'

'मला कळून चुकलं होतं की 10 ते 7 ची ही नोकरी मला समाधानही देणार नाही आणि चांगलं उत्पन्नही. त्याचवेळी मी काहीतरी वेगळं करायचा विचार करत होतो. मी जॉब सोडून दिला आणि गावाला आलो.'

शेअर बाजार आणि FD ऐवजी इथे गुंतवा पैसे, मिळेल बंपर नफा

सुरुवातीचं संशोधन

रवि सांगतात, गावात आल्यावर मी पाहिलं, इथे नीलगायी पिकांचं खूप नुकसान करतात. त्यामुळे हजारो रुपयांची हानी होते. पण झेंडूच्या फुलांच्या शेतीचं मात्र नीलगायी नुकसान करत नव्हत्या. हे पाहिल्यावर मी दोन बिघा जमिनीत झेंडूची रोपं लावली. 3 महिन्यांत झाडांना फुलं आली आणि मी फुलशेती करणारा शेतकरी झालो.

3 हजार रुपयांत 30 - 50 हजारचं उत्पन्न

एक बिघा जमिनीत झेंडू लावायचा असेल तर नर्सरीतून रोपं आणण्यापासून ते खतांचा खर्च धरून 3 हजार रुपये लागतात. फुलं आल्यानंतर 30 ते 40 हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं. जेव्हा सीझन असतो तेव्हा मागणीही जास्त असते. मग उत्पन्नात वाढ होते.

ही कंपनी पुढच्या 6 महिन्यांत 3 हजार जणांना देणार नोकरी

विरोध मावळला

रवि पाल जेव्हा सुरुवातीला नोकरी सोडून गावात शेती करायला आले तेव्हा सगळे जण त्यांना म्हणत होते, एवढं शिक्षण आणि चांगला जॉब सोडून तू या गावात का आला आहेस ? आता मात्र झेंडूच्या फुलांनी लहरणारी शेती पाहून त्यांचा विरोध मावळला आहे.

===========================================================================================================

VIDEO : कृष्णकुंज ते ईडी कार्यालय, असा होता राज ठाकरेंच्या चौकशीचा घटनाक्रम

First published: August 24, 2019, 8:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading