मुंबई, 01 डिसेंबर: IAS अधिकारी हे पद देशातील सर्वात प्रतिष्ठित पदांमध्ये गणले जाते. या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी, भारतातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजेच UPSC परीक्षा (UPSC Exam Preparation Tips) या तिन्ही टप्प्यात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. चांगल्या पदावर आणि तुमच्या पसंतीनुसार तुम्ही IAS (IAS officer success story), IPS (IPS officer Success story) किंवा IFS अधिकारी होऊ शकता. मात्र ही परीक्षा पास करणं वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी जीवाचं रान करून आणि मेहनत करून परीक्षा उत्तीर्ण (How to crack UPSC exam) करावी लागते. जे उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण करतात अशा उमेदवाराची यशोगाथा (IAS success story) साधारण नसते. आज आपण अशाच एका IAS अधिकाऱ्याबाबत जाणून घेणार आहोत.
मूळचा बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील, कुमार अनुराग (IAS Kumar Anurag success story) शालेय जीवनात अभ्यासात फारसा खास नव्हते. पण त्यांचे इरादे मजबूत होते आणि स्वप्ने मोठी होती. अभ्यासात फार हुशार नसतानाही त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSCची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यामुळे त्यांनी किती मेहनत घेतली असेल यावरून याचा अंदाज येऊ शकतो.
दहावीत झाले होते नापास
कुमार अनुरागने आठवीपर्यंत हिंदी माध्यमात शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याच्या पालकांनी त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करून घेतले. पण हा बदल त्यांना सहज वाटला नाही, ज्यामुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला. दहावीच्या पूर्व बोर्डातही ते नापास झाले. यानंतर मेहनतीच्या जोरावर त्याने दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा सरासरी गुणांनी उत्तीर्ण केली.
विद्यार्थ्यांनो, केवळ शिक्षण घेऊन आणि डिग्री मिळवून अर्थ नाही; 'या' गोष्टीही IMP
कॉलेजमध्येही झाले नापास
शालेय जीवनात विशेष क्रमांक न मिळाल्याने कुमार अनुरागने दिल्लीतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण पदवीच्या एका विषयात ते नापास झाले. यानंतर कसेतरी त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षणादरम्यान, कुमार अनुराग यांचा यूपीएससी परीक्षेकडे कल होता.
UPSC साठी केली प्रचंड मेहनत
कुमार अनुराग यांनी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. UPSC परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या यशाच्या टिप्स वाचा आणि खूप समर्पणाने स्वतःला तयार करा. कुमार अनुराग यांनी 2017 मध्ये पहिल्याच प्रयत्नात 677 वा क्रमांक मिळवला होता. मात्र यावर ते समाधानी नव्हते आणि म्हणूनच दुप्पट मेहनत घेऊन 2018 मध्ये 48 वा क्रमांक (IAS ) मिळवून IAS अधिकारी बनले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.