मुंबई, 27 ऑक्टोबर: नोकरी गेल्यानंतर अनेकांच्या जीवनावर परिणाम होतो. आता जगायचं कसं? असा प्रश्न त्यांना सतावतो. मात्र, अशावेळी काहीजण निराश होतात, तर काहीजण जगण्यासाठी नवा मार्ग शोधतात. अमेरिकेतील एका महिलेनं नोकरी गेल्यानंतर अशाच पद्धतीनं स्वतःच पोट भरण्यासाठी एक नवा मार्ग अवलंबून पाहिला, आणि आज ती महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. जेनिस टोरेस असं या महिलेचं नाव आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय.
जेनिस टोरेस या एक इंजिनीअर आहेत. 2013 मध्ये त्यांची नोकरी गेली. या वेळी त्यांना महिन्याला पगार 5.5 लाख रुपये होता. म्हणजेच, नोकरीतून त्यांना वर्षाला तब्बल 66 लाख रुपये मिळत होते. त्यामुळेच 2013 मध्ये जेव्हा त्यांची नोकरी गेली, तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला. मात्र, याचवेळी टोरेस यांनी मनाशी पक्का निश्चिय केला की, आता असे काही काम करू जेणेकरुन उत्पन्नाचा स्रोत कायमस्वरुपी सुरू राहील. भलेही नोकरी जावो वा राहो, पण स्वतःच्या दैनंदिन खर्चाचं टेन्शन राहणार नाही.
IT Jobs: दिवाळीत IT कंपन्यांचा बंपर धमाका; Amazon ते Paytm मध्ये बंपर जॉब ओपनिंग्स; करा अर्ज
अवघ्या काही दिवसांमध्येच टोरेस यांना पैसे कमवण्याचा असा काही मार्ग सापडला की, ज्यामुळे त्यांना आता महिन्याला लाखो रुपये मिळतात. कारण नोकरीच्या काळात त्यांनी ‘डेलिश डी लाइट्स’ नावानं एक फूड ब्लॉग सुरू केला होती. पण तेव्हा हा ब्लॉग कमाईचं साधन नव्हे तर एक छंद होता. नोकरी गेल्यानंतर टोरेस यांनी या ब्लॉगकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या रोज एक पोस्ट ब्लॉगवर अपलोड करत होत्या. यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलं. सीएनबीसीच्या ‘मेक इट हॅपन’ कार्यक्रमात बोलताना टोरेस म्हणाल्या,‘2015 पर्यंत हळूहळू हा फूड ब्लॉग इतका लोकप्रिय झाला की त्याची महिन्याला वाचक संख्या 15,000 पर्यंत पोहोचली. त्यानंतर मी ‘यो क्वेरो डिनेरो’ हे मनी पॉडकास्ट सुरू केलं. या पॉडकास्टद्वारे, मी माझा अनुभव शेअर करते आणि लोकांना पैसे कसे कमवायचे ते शिकवते.’
महिन्याला मिळतात लाखो रुपये
टोरेस यांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली, व यासोबतच त्या फ्रीलान्सर म्हणून विविध कामे करत गेल्या. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडत गेली. टोरेस सांगतात, ‘माझ्या सर्व कामांतून मिळणारं उत्पन्न एकत्र केल्यास ते दरमहा सरासरी 35,000 डॉलर म्हणजेच 28,96,549 रुपये आहे. यामध्ये मुख्य काम वगळता इतर कामांतून मिळणारं उत्पन्न हे 8,27,292 रुपये आहे.’ याचाच अर्थ टोरेस यांना त्यांच्या साईड बिझनेसमधून दर महिन्याला 8 लाखांहून अधिक उत्पन्न मिळतं.
टोरेस इतरांना सल्ला देताना सांगतात की, ‘एखाद्या कारणास्तव तुमची नोकरी गेली, तर तुम्ही साइड बिझनेस करा. आपणास आवडत नसलेल्या कामावर लक्ष केंद्रित करा. एखादं काम आवडत नाही, कारण त्या व्यक्तीला असं वाटतं, की त्याच्याकडे ते काम करण्याची क्षमता नाही. पण तुमच्यातील कमतरतेचा शोध घेऊन तुम्हाला न आवडणाऱ्या कामात पुढे जा.’
IT Jobs: 'या' मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये पर्मनंट वर्क फ्रॉम होम जॉब्स; पात्र असाल तर चान्स सोडू नका
ब्लॉगनं बदलवलं नशीब
टॉरेस यांनी सांगितलं की, ‘माझ्या ब्लॉगवर जाहिरातींचा ओघ वाढला, व माझी कमाई 100,000 डॉलर पर्यंत पोहोचली. या जाहिराती माझ्या ब्लॉगवर छापलेल्या डिस्प्ले जाहिरातींच्या स्वरूपात होत्या.’ टोरेस यांच्या मते, पैसे कमवण्याचे सीपीसी आणि सीपीएम हे दोन मार्ग आहेत. सीपीसी म्हणजे ‘कॉस्ट पर क्लिक’ आणि सीपीएम म्हणजे ‘कॉस्ट पर मिलि आणि थाउजंड’.
टॉरेस यांनी सांगितलं की, ‘तुम्हाला तुमच्या मुख्य कामाशिवाय इतर कामातून मिळणारं उत्पन्न तेव्हाच सुरू होतं, जेव्हा तुम्ही फ्रीलान्स काम करता, किंवा अतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी काही साइड बिझनेस करता. मी ब्लॉगसोबत विविध 10 कामं करण्यास सुरुवात केली होती. ज्यामध्ये पॉडकास्ट जाहिराती, मार्केटिंग, स्पीकिंग एंगेजमेंट, डिजिटल कोर्स डाउनलोड आणि ब्रँड भागीदारी यांचा समावेश होता.’
IT Jobs म्हंटलं की Coding आलंच; मुलाखतीला जात असाल तर 'या' चुका करू नका
नोकरी गेल्यानंतर अनेकजण निराश होतात. पण नोकरी गेल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जात मार्ग शोधल्यास यश मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतील या महिलेचा प्रवास आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Career opportunities, Success stories, Success story