मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

यश आणलं खेचून! हॉटेलात वेटर म्हणून करत होते काम; जिद्दीच्या जोरावर IAS होण्याचं स्वप्न पूर्ण

यश आणलं खेचून! हॉटेलात वेटर म्हणून करत होते काम; जिद्दीच्या जोरावर IAS होण्याचं स्वप्न पूर्ण

वेटर म्हणून काम करत असताना स्वतःच्या परिश्रमाच्या जोरावर UPSC क्रॅक करून IAS ऑफिसर बनण्याचं स्वप्न एका व्यक्तीनं पूर्ण केलंय.

वेटर म्हणून काम करत असताना स्वतःच्या परिश्रमाच्या जोरावर UPSC क्रॅक करून IAS ऑफिसर बनण्याचं स्वप्न एका व्यक्तीनं पूर्ण केलंय.

वेटर म्हणून काम करत असताना स्वतःच्या परिश्रमाच्या जोरावर UPSC क्रॅक करून IAS ऑफिसर बनण्याचं स्वप्न एका व्यक्तीनं पूर्ण केलंय.

  • Published by:  Atharva Mahankal

शून्यातून वर येणं (Success story) ही म्हण आपण सर्वांनीच ऐकली असेल. स्वतःकडे काहीही नसताना जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर यश अक्षरशः खेचून आणणे म्हणजेच शून्यातून विश्व निर्माण करणे. असंच काहीसं काम केलंय एका वेटरनं (Waiter to IAS Officer Success story of man). हो आम्ही हॉटेलात काम करणाऱ्या एका वेटरबद्दलच बोलतोय. वेटर म्हणून काम करत असताना स्वतःच्या परिश्रमाच्या जोरावर UPSC क्रॅक (Waiter cracked UPSC Exam) करून IAS ऑफिसर बनण्याचं स्वप्न एका व्यक्तीनं पूर्ण (Success Story of IAS Officer) केलंय.

वेटरचं काम करत IAS होणाऱ्या या ऑफिसरचं नाव आहे के जयगणेश. उत्तर तमिळनाडूतील अंबूर जवळील कन्नमंगलम या दुर्गम गावात जन्मलेले, जयगणेश के. हे आपल्या उदरनिर्वाहासाठी एका छोट्या हॉटेलात वेटर म्हणून करत होते. जयगणेश यांनी वेल्लोरच्या शासकीय थंथाई पेरियार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली होती. मात्र तरीही त्यांना ही वेटरची नोकरी करावी लागत होती.

हे वाचा - याला म्हणतात जिद्द! नोकरी करताना तब्बल 7 तास करायचे अभ्यास; डॉक्टर नंतर झाले IAS

"मी माझ्या गावातून तीन वेळा नागरी सेवा परीक्षांना बसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मला हे समजलं की ते बनवण्यासाठी मला चेन्नईमध्ये राहणं आवश्यक आहे. म्हणून मी IAS कोचिंगसाठी सरकारी संचालित अखिल भारतीय संस्थेत प्रवेश मिळवला. अण्णा नगर इथे आल्यानंतर, मला माझं मासिक 600 रुपयांचं मेस बिल आणि प्रवास भरण्यासाठी जे काही काम मिळेल ते करावं लागलं",असं के. जयगणेश सांगतात.

UPSC परीक्षेचे तब्बल 6 प्रयत्न करूनही त्यांना यश मिळू शकलं नव्हतं. मात्र अखेर त्यांना यश मिळालंच. यामुळे एका वेटर असणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाचं थेट IAS होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. अर्थात हा प्रवास सोपी नव्हता. वेटर काम करत असताना त्यांच्या परिश्रमाचं आणि अभ्यासादरम्यान मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. यश खेचून आणणं यालाच म्हणतात.

First published:

Tags: Ias officer, Success, Success story, Upsc exam