Success Story : स्टँड अप कॉमेडी ऐकतऐकत अक्षत गोयल झाला CA चा टॉपर

Success Story : स्टँड अप कॉमेडी ऐकतऐकत अक्षत गोयल झाला CA चा टॉपर

एखाद्या टॉपरचा यशाचा मंत्र काय असं विचारलं तर हल्ली एक उत्तर ऐकायला मिळतं. कठोर मेहनत, मोबाइल आणि सोशल मीडियापासून दूर राहिल्यामुळेच मला हे यश मिळालं. पण आता असा एक टॉपर आहे की ज्याने याच गोष्टींना आपल्या यशाचं श्रेय दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : एखाद्या टॉपरचा यशाचा मंत्र काय असं विचारलं तर हल्ली एक उत्तर ऐकायला मिळतं. कठोर मेहनत, मोबाइल आणि सोशल मीडियापासून दूर राहिल्यामुळेच मला हे यश मिळालं. पण आता असा एक टॉपर आहे की ज्याने याच गोष्टींना आपल्या यशाचं श्रेय दिलं आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मध्ये पहिल्या आलेल्या अक्षत गोयलने स्टँडअप कॉमेडियन झाकिर खानची कॉमेडी ऐकतऐकत अभ्यासाचा ताण घालवला. तो सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह होता.

अक्षत म्हणतो, 'CA साठी मी रोज 14 ते 16 तास अभ्यास करायचो. अभ्यास करून शीण आला की मग हा ताण घालवण्यासाठी मी स्टँड अप कॉमेडी बघायचो. माझा रिकामा वेळ याच स्टँड अप कॉमेडीमध्ये जायचा.'

सोशल मीडियाची मदत

CA च्या तयारीसाठी मी सोशल मीडिया ग्रुप्सचीही मदत घेतली, असं अक्षतने सांगितलं. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा ग्रुप्समध्ये मी अ‍ॅक्टिव्ह असायचो कारण या ग्रुप्समध्ये CA च्या तयारीची चर्चा व्हायची, असंही तो सांगतो.

अक्षतने एक दिवसही वाया न घालवता रोज अभ्यास केला.ICAI तर्फे दिल्या जाणाऱ्या अभ्यासाच्या साहित्याची त्याला खूप मदत झाली. परीक्षेच्या एक आठवडा आधी त्याने मॉक टेस्ट्सचा सीरीजमध्ये सराव केला.

विंग कमांडर अभिनंदन मिग विमानातून पुन्हा घेणार भरारी

12 वीच्या परीक्षेत आला दुसरा

अक्षत CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत दुसरा आला होता.त्याला 98.8 टक्के गुण मिळाले होते. गणित हा त्याच्या आवडीचा विषय आहे. जेव्हाजेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो गणितं सोडवतो. अक्षतचे वडीलही CA आहेत.

ICAI CA इंटरमीडिएट या परीक्षेत मुंबईचा अनिल शहा दुसरा आला तर पानिपतच्या अंजली गोयलने तिसरा क्रमांक पटकावला.

=====================================================================================

'छोरा मुंबई किनारेवाला', आदित्य ठाकरेंबद्दलचा हा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 08:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading