मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: एकच वेळ, एकच परीक्षा आणि एकच ध्यास; आई आणि मुलानं सोबत मिळवली सरकारी नोकरी

Success Story: एकच वेळ, एकच परीक्षा आणि एकच ध्यास; आई आणि मुलानं सोबत मिळवली सरकारी नोकरी

बिंदू आणि विवेक

बिंदू आणि विवेक

सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या या आई-मुलाच्या जोडप्याने केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकत्र यश मिळवले आहे. दोघांनीही सोबतच यश मिळवल्यामुळे त्यांचं संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे.

    मुंबई, 10 ऑगस्ट: दरवर्षी लाखो उमेदवार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पर्यटन करत असतात. या सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी प्रचंड मेहनतही घेत असतात. मात्र यातील सरावांचं सरकारी मिळते असं नाही. पण आता विचार करा तुम्ही आणि तुमच्या आईने सोबतच सरकारी नोकरीची परीक्षा दिली आणि सोबतच पास झालात तर? तुम्ही म्हणाल हे शक्य नाही. पण हे शक्य झालंय. आणि अशाच सोबत सरकारी नोकरी मिळवलेल्या माय-लेकाच्या यशोगाथेबद्दल (Bindu and Vivek Success Story) जाणून घेणार आहोत. केरळ लोकसेवा आयोगाचा निकाल लागल्यापासून ही आई-मुलाची जोडी चर्चेत आली आहे. सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या या आई-मुलाच्या जोडप्याने केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकत्र यश मिळवले आहे. दोघांनीही सोबतच यश मिळवल्यामुळे त्यांचं संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची महारत्न कंपनी GAIL इंडियामध्ये तब्बल 282 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; कोण असतील पात्र? इथे मिळेल माहिती केरळमधील मल्लपुरम येथे राहणाऱ्या 42 वर्षीय बिंदू आणि त्यांचा 24 वर्षीय मुलगा विवेक यांनी केरळ लोकसेवा आयोगाने घेतलेली परीक्षा पास केली आहे. आई-मुलाच्या या खास जोडीला एकत्र सरकारी नोकरी करण्याची संधी मिळाली आहे. त्याची यशोगाथा सर्वांना प्रेरणा देण्यासाठी पुरेशी आहे. बिंदू आणि विवेक यांनी मिळून या सरकारी नोकरीची तयारी सुरू केली. बिंदूने 'लास्ट ग्रेड सर्व्हंट' (एलडीएस) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यामध्ये त्यांचा 92 वा क्रमांक आला आहे. त्याच वेळी, त्यांचा मुलगा विवेक याने लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ज्यामध्ये त्याला 38 वा क्रमांक मिळाला आहे. दोघांनीही एकाच कोचिंगमधून शिक्षण घेतले आहे. अर्थात, ते दोघे एकत्र शिकत होते पण ते एकत्र परीक्षा उत्तीर्ण होतील याची त्यांना कल्पना अजिबात नव्हती. विवेक 10वीत असताना बिंदूने तेव्हापासूनच सरकारी नोकरीची तयारी सुरू केली होती. यादरम्यान बिंदूनेही आपल्या मुलासोबत पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. बिंदू या गेल्या १० वर्षांपासून अंगणवाडी शिक्षिका आहेत. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी पती, शिक्षक, मित्र आणि मुलाचे सहकार्य लाभले असे त्यांचे म्हणणे आहे. क्या बात है! फ्रेशर्ससाठी IIT मध्ये फ्री कोर्सेस आणि Sony कंपनीत नोकरीही; हा गोल्डन चान्स सोडू नका एकूणच काय तर यश मिळवण्यासाठी तुम्ही तरुणच असले पाहिजेत असं काहीही नाही. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कोणत्याही परीक्षेत आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येऊ शकतं हे या आई-मुलाच्या जोडीनं दाखवून दिलं आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Education, Job, Success stories, Success story

    पुढील बातम्या