Success Story : कॉलेजमध्ये शिपाई असलेले अरुण वाल्वी करतायत PHD

गुजरातच्या अरुण वाल्वींनी पीएचडीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ज्या कॉलेजमध्ये ते शिपायाचं काम करतात त्याच कॉलेजसारख्या कॉलेजमध्ये प्राध्यापक बनण्याची त्यांची इच्छा आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2019 07:15 AM IST

Success Story : कॉलेजमध्ये शिपाई असलेले अरुण वाल्वी करतायत PHD

सुरत, 2 ऑगस्ट : पीएचडी करून डॉक्टर व्हावं, एखाद्या विषयातलं सखोल ज्ञान मिळवावं, अशी महत्वाकांक्षा असणाऱ्या सगळ्यांनाच हे ध्येय गाठता येतं असं नाही. त्यासाठी कठोर मेहनत आणि चिकाटी हवी.

गुजरातच्या अरुण वाल्वींनीही हे स्वप्न पाहिलं आणि तेही कॉलेजमध्ये शिपायाचं काम करत असताना. 34 वर्षांचे अरुण वाल्वी हे वीर नर्मद साउथ गुजरात युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंच्या कार्यालयात शिपायाचं काम करतात. त्यांची पत्नी सुरतमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचं काम करते. त्यांना एक वर्षांची मुलगीही आहे.

आदिवासी भागासाठी प्रेरणा

अरुण वाल्वींनी पीएचडीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ते ज्या दक्षिण गुजरातच्या आदिवासी भागातून येतात त्या भागात अशी परीक्षा उत्तीर्ण झालेले ते पहिले व्यक्ती आहेत. ज्या कॉलेजमध्ये ते शिपायाचं काम करतात त्याच कॉलेजसारख्या कॉलेजमध्ये प्राध्यापक बनण्याची त्यांची इच्छा आहे.

शिपायाचं काम करणाऱ्या वाल्वींनी जेव्हा PHD करण्याचा विचार बोलून दाखवला तेव्हा लोकांनी त्यांना नावं ठेवली. ते चांगली गुजरातीही बोलू शकत नव्हते. मग PHD काय करणार, असा प्रश्न विचारून लोक खिल्ली उडवायचे. पण मी माझ्याच भाषेत माझे विचार पटवून देऊ शकतो, असं त्यांनी ठासून सांगितलं.

Loading...

CM फडणवीस राजकीय आयुष्यातील मोठी जोखीम पत्करणार?

अरुण सध्या PHD च्या प्रेझेंटेशनमध्ये व्यग्र आहेत. ते शिपायाची नोकरी करतात. त्यातन महिन्याला 13 हजार रुपये मिळतात. त्यातूनच अरुण त्यांच्या PHD साठी तयारी करतायत. त्यांनी PHD साठी अजून विषय निवडलेला नाही. एकदा प्रेझेंटेशन झालं की मग मी माझा विषय निवडेन, असंही ते सांगतात.

वाल्वी यांनी 10 जूनला PHDची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी 200 पैकी 110 गुण मिळवले. ही परीक्षा त्यांनी गुजराती भाषेतच दिली होती. मी भलेही छोट्याशा गावात राहत असेन पण माझी स्वप्नं मोठी आहेत,असं ते म्हणतात. अवघ्या जगाला मागे टाकण्याचं माझं स्वप्न आहे, असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्यांच्यातला आत्मविश्वास दिसून येतो.

VIDEO : या शहाण्या माकडाने पाणी पिऊन झाल्यावर नळ केला बंद

अरुण यांचे आईवडील मजुरी करतात. ते निरक्षर आहेत. आपला खर्च भागवण्यासाठी अरुण यांनी पेट्रोल पंपावर काम सुरू केलं. कधीकधी ते रोजंदारीवरही काम करायचे. या सगळ्यामध्ये त्यांनी शैक्षणिक प्रगती मात्र सुरूच होती. त्यांनी बीए आणि एमएची फर्स्ट क्लास डिग्री मिळवली आहे. तापी जिल्ह्यातल्या भीलामोली गावातून येऊन अरुण वाल्वी यांनी ही वाटचाल केली.

PHD झाल्यानंतर प्राध्यापक बनावं किंवा सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून द्यावं, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्या आदिवासी भागातल्या अनेक मुलांसाठी अरुण वाल्वी हे प्रेरणास्थान आहेत.

=================================================================================================

पावसाळी सहलीचा प्लान करताय, 'या' धबधब्यावर नक्की जा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2019 07:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...