मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Success Story: वडील आणि भावाला गमावूनही तो हरला नाही हिंमत, पहिल्याच प्रयत्नात झाला IAS

Success Story: वडील आणि भावाला गमावूनही तो हरला नाही हिंमत, पहिल्याच प्रयत्नात झाला IAS

हिमांशुने हरियाणामधल्या भुनामधून पाचवीपर्यंत हिंदी माध्यमातूनच शिक्षण घेतलं होतं. 12 वी पर्यंतचं शिक्षणही छोट्या गावात झालेलं. तो कॉलेजला आला तेव्हा त्याला इंग्रजी शब्दांचे उच्चारही करता येत नव्हते. पण मेहनतीच्या जोरावर त्याने त्यावरही मात केली. आज तो एक यशस्वी आयएस अधिकारी आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 30 जुलै : ही कहाणी आहे, हरियाणामधल्या एका छोट्याशा गावात शिकून UPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या हरियाणाच्या हिमांशु नागपालची. हरियाणामधल्या भुनानगरमधून पदवी घेतल्यानंतर तो दिल्लीला आला. दिल्ली युनिव्हर्सिटीमधल्या हंसराज कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी तो वडिलांसोबत आला होता.कॉलेजमध्ये लागलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या यादीकडे बघून त्याचे वडील त्याला म्हणाले, हिमांशु, एक दिवस या यादीत मला तुझं नाव पाहायचं आहे.

हिमांशुची अ‍ॅडमिशन झाल्यावर त्याचे वडील घरी निघाले होते पण तेव्हाच त्याच्या वडिलांचा मृत्यू ओढवला. हिमांशु म्हणतो, जीवनात ज्या अडचणी येतात त्यातून शिकणं खूप गरजेचं आहे. एकीकडे माझे वडील नव्हते तर दुसरीकडे कॉलेजमध्ये वेगळंच वातावरण होतं.

मित्र आणि शिक्षकांनी केली मदत

या काळात मित्र आणि शिक्षकांनी हिमांशुला धीर दिला. त्याची आई, मोठा भाऊ आणि काकांनी त्याला समजावलं, आयुष्य अजून संपलेलं नाही. हिमांशुने हरियाणामधल्या भुनामधून पाचवीपर्यंत हिंदी माध्यमातूनच शिक्षण घेतलं होतं. 12 वी पर्यंतचं शिक्षणही छोट्या गावात झालेलं. तो कॉलेजला आला तेव्हा त्याला इंग्रजी शब्दांचे उच्चारही करता येत नव्हते. पण मेहनतीच्या जोरावर त्याने त्यावरही मात केली.

त्याला आठवतं, एकदा तर त्याने एमपी आणि एमएलए यामध्ये काय फरक आहे ते विचारलं तेव्हा सगळ्यांनीच त्याची थट्टा केली होती. आता मात्र त्याच व्यवस्थेमधला तो एक वरिष्ठ अधिकारी बनला आहे.

LICच्या या स्कीममध्ये 5 लाख रुपये गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा महिना 8 हजार

कॉलेजचे दिवस चांगले चालले होते पण त्यातच हिमांशुचा मोठा भाऊही वारला. यावेळेस त्याला वाटलं, आता आपलं शिक्षण थांबेल, आईकडे पुन्हा जावं लागेल. पण त्याच वेळी त्याचे काका पंकज नागपाल यांनी त्याला मदत केली. त्याच वेळी त्याने ठरवलं, आपण आयएएस बनायचं.

कुटुंबीयांच्या मदतीने हिमांशुने त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि आज तो एक यशस्वी आयएएस अधिकारी आहे. हिमांशुने त्याच्या काकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो म्हणतो, मला माझ्या आयुष्यात दोन वडील मिळाले. एका वडिलांनी जन्म दिला आणि दुसऱ्या वडिलांनी जीवन दिलं!

=============================================================================================================

कोसळणारा पाऊस आणि पूर, अशा परिस्थितीत 6 महिन्याच्या तान्हुल्याला तरुणाने वाचवलं, VIDEO व्हायरल

First published:
top videos

    Tags: Career, Success story, Upsc exam