देशात प्रथमच ‘रॅप’चं प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम, मुंबई विद्यापीठाचा कौतुकास्पद निर्णय

देशात प्रथमच ‘रॅप’चं प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम, मुंबई विद्यापीठाचा कौतुकास्पद निर्णय

मुंबईतील (Mumbai) विलेपार्ले (Ville parle) इथल्या उषा प्रवीण गांधी अर्थात युपीजी कॉलेजनं हिपहॉप (HipHop-Rap) या कलाप्रकाराचा अभ्यासक्रम सुरू करत एक नवीन पायंडा पाडला आहे. एक वर्षापेक्षा जास्त काळ पाठपुरावा केल्यानंतर मुंबई विद्यापीठानं (Mumbai University) या अभ्यासक्रमाला परवानगी दिली आहे.

  • Share this:

मुंबई 27 फेब्रुवारी : गेल्या काही वर्षापासून हिप-हॉप अर्थात रॅप (Rap Song) हा गाण्याचा पाश्चात्त्य प्रकार भारतातही लोकप्रिय झाला आहे. रॅप म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे ते लयबद्ध पद्धतीनं आणि गतिमान पद्धतीनं म्हणणं असं म्हणता येईल. अलीकडेच आलेल्या गलीबॉय (Gully Boy) या चित्रपटानं भारतातील रॅपर्सचं (Rapper) विश्व, या कलेत करियर करण्याकडं तरुणाईचा असलेला ओढा, यातील संधी यावर प्रकाश टाकला होता. अगदी जुन्या हिंदी चित्रपटात अशोककुमार यांनी म्हटलेलं रेलगाडी हे भारतातलं पहिलं रॅपसॉंग असल्याचं मानलं जातं. अलीकडच्या काळात हिप-हॉप अर्थात रॅपचा चांगलाच प्रसार झाला असून अनेक नामवंत भारतीय कलाकार जगभरात प्रसिद्ध आहेत. अशा या लोकप्रिय कलाप्रकाराचं तरुण पिढीला शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावं या उद्देशानं मुंबईतील एका कॉलेजनं चक्क प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. देशातला अशाप्रकारचा हा पहिला अभ्यासक्रम आहे.

मुंबईतील (Mumbai) विलेपार्ले (Ville parle) इथल्या उषा प्रवीण गांधी अर्थात युपीजी (Usha Pravin Gandhi-UPG) कॉलेजनं हिपहॉप (HipHop-Rap) या कलाप्रकाराचा अभ्यासक्रम सुरू करत एक नवीन पायंडा पाडला आहे. एक वर्षापेक्षा जास्त काळ पाठपुरावा केल्यानंतर मुंबई विद्यापीठानं (Mumbai University) या देशातल्या अशा प्रकारच्या पहिल्या अभ्यासक्रमाला परवानगी दिली आहे. मार्चपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार असून, त्यासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. या कॉलेजातील प्राध्यापक यतीन्द्र इंगळे (Yatindra Ingale)यांनी हा अभ्यासक्रम आखण्यासाठी, त्याचं मटेरियल तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा अभ्यासक्रम कलाकारांना सखोल ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल, तसंच कला (Arts), इतिहास (History) आणि आधुनिक जीवनशैली यांची सांगड घालण्यासाठी याची मोलाची मदत होईल, असं इंगळे यांनी म्हटलं आहे. या प्रकाराला असलेला सांस्कृतिक संदर्भ आणि विद्यार्थ्यांशी जोडले जाण्याची खुबी यामुळं कॉलेजमधील शिक्षणातूनच सामाजिक आणि सांस्कृतिक जागरूकता निर्माण करण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल, असंही प्राध्यापक इंगळे यांनी सांगितलं.

इंगळे हे स्वतः एक रॅपर (Rapper) असून, गेल्या दहा वर्षांपासून ते रॅपर म्हणून कार्यरत आहेत. मुंबईतील रॅपर्सच्या वर्तुळात ते प्रसिद्ध आहेत. हा अभ्यासक्रम संवाद कौशल्य (Communication Skill) वाढवण्यासाठी महत्त्वाचे साधन असल्याचं त्याचं म्हणणं आहे. कारण न्यूयॉर्कमध्ये आफ्रिकन अमेरिकन्स (African Americans) आणि इतर वंचित गटांनी त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्यासाठी ही कला विकसित केली होती, असंही इंगळे यांनी सांगितलं.

तीन महिने कालावधीचा साठ तासांचा हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course) आहे. या अभ्यासक्रमात कलाप्रकार, महिलांमध्ये असलेला हिपहॉपचा वापर, सीमाभागातील कलाप्रकार अशा विविध पैलूंवर भर देण्यात आला आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना शिकवणार असून, लेखी परीक्षा घेऊनच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

2 वर्षापूर्वीच हा अभ्यासक्रम सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र तज्ज्ञांच्या समितीनं याचा आढावा घेऊन परवानगी मिळण्यास उशीर झाल्यानं यंदा मार्चपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. दरम्यानं विद्यापीठ पदविका आणि पदवी स्तरावर याचा विस्तार करण्याचा विचार करत आहे.

First published: February 27, 2021, 3:33 PM IST

ताज्या बातम्या