मुंबई, 16 ऑक्टोबर: जगभरातील अनेक विद्यार्थी दरवर्षी अनेक परीक्षा देतात. यामध्ये काही विद्यार्थ्यांना भरघोस यश (Success) मिळतं तर काही विद्यार्थ्यांच्या नशिबी मात्र अपयश येतं. सर्वच विद्यार्थी यश संपादन करण्यास पात्र असतात सक्षम असतात, मात्र सगळ्यांनाच ते मिळू शकत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी (Difficulties in study). अनेक विद्यार्थ्यांना कितीही अभ्यास केला, कितीही वाचलं तरी काहीच लक्षात राहत नाही. यामुळे ऐन परीक्षेच्या वेळी अशा विद्यार्थ्यांना उत्तरं आठवत नाहीत (How to Remember answers quickly). पण आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Study tips) देणार आहोत ज्यामुळे एकदा वाचलेलं तुम्ही कधीही विसरणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या सोप्या टिप्स.
पोपटपंची करा बंद
काही विद्यार्थी विषय वाचून समजून घेण्याऐवजी पोपटपंची करण्याचा प्रयत्न करतात. इतकंच नाही तर ते गणितं आणि आकृतीही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कोणताही विषय लक्षात ठेवण्याऐवजी समजून घेण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यामुळे गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतील.
उजळणी करत राहा
कोणत्याही विषयाचा एकदा अभ्यास केल्यावरच तो लक्षात राहिला पाहिजे असं नाही. जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा त्याची उजळणी करा. जोपर्यंत तो विषय तुमच्या मनात पूर्णपणे बसत नाही तोपर्यंत उजळणी करत रहा. यामुळे तुम्हाला उत्तरं दीर्घकाळ लक्षात राहतील.
हे वाचा - TCS कर्मचाऱ्यांसाठी 15 नोव्हेंबर तारीख ठरणार महत्त्वाची; कंपनीनं घेतला निर्णय
उत्तरं लिहून बघा
विषय फक्त वाचून लक्षात ठेवता येत नाहीत. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लिहून लक्षात ठेवता तेव्हा ती तुमच्या स्मरणात कायमची बसते. यासह, लेखन सराव देखील चांगल्या पद्धतीनं केला जातो. तसंच सर्व गणितं हे सोडवून बघा.
गोष्टी दुसऱ्यांना समजवून सांगा
एखाद्या गोष्टीला अंतिम रूप देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो दुसऱ्याला समजावून सांगणे. यामुळे तुमची मेमरी पॉवर मजबूत होईल आपण इच्छित असल्यास, आपण YouTube वर संबंधित विषयांचे व्हिडिओ देखील पाहू आणि ऐकू शकता. यामुळे तुम्हाला गोष्टी लक्षात राहू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, जॉब