मुंबई, 12 डिसेंबर: अभ्यास करायचा म्हंटलं की विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर येते ते अंधुक प्रकाश येणारी खोली, एक टेबल, त्यावर ठेवलेली पुस्तकं. हे सगळं आणि अभ्यासाचं टेन्शन (How to avoid Exam tension) असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची इच्छा होत नाही. सतत मनात इतर विचार येत असतात. मित्रांचा अभ्यास झाला असेल का? मित्र आता काय करत असेल? असे प्रश्नही मनात येत असतात. मात्र अभ्यास (How to study well) होत नाही. पण एका छान खोलीत तुम्ही आणि तुमचे मित्रं सोबत अभ्यास केला तर? हो हे शक्य आहे. एकाच ग्रुप स्टडी (How to do Group Study) म्हणतात. तुम्ही आणि तुमच्या वर्गातील तुमचे मित्रं मिळून अभ्यास केला तर लवकरात लवकर अभ्यास (Tips to do group Study) होऊ शकतो आणि चांगला अभ्यास होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स (career Tips) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही चांगल्याप्रकारे Group Study करू शकता. चला तर मग जाणून घेउया.
जसजशी परीक्षांची तारीख जवळ येते तसतशी मुले आणि पालक सर्व तणावाखाली येऊ लागतात. बर्याच वेळा परिस्थिती अशी असते की एक हुशार मुलगा देखील तणावाखाली येतो आणि परीक्षेच्या वेळी गडबड करतो (Exam Stress). म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांना शांत आणि निवांत राहण्याचा सल्ला दिला जातो. विद्यार्थ्यांनी नेहमी त्याच पॅटर्नमध्ये अभ्यास केला पाहिजे ज्यामध्ये त्यांना आरामदायक वाटते. कोणत्याही दबावाखाली तुमची अभ्यासाची पद्धत कधीही बदलू नका. जर तुम्हाला ग्रुप स्टडी जमत नसेल तर स्वतःच्या सोयीनुसार अभ्यास करा.
विद्यार्थ्यांनो, रात्रभर जागून बिनधास्त करा अभ्यास; येणार नाही झोप; वाचा Tips
इथे टाळा ग्रुप स्टडी
तसे तर ग्रुप स्टडीचे अनेक फायदे आहेत. अनेक लोकांसोबत अभ्यास केल्याने तुमच्या कमकुवतपणाची आणि ताकदीची चांगली कल्पना येते. मात्र परीक्षेच्या एक दिवस आधी किंवा त्याच दिवशी उजळणी करताना कोणत्याही ग्रुपसोबत अभ्यास करू नका. अशा वेळी एकटे अभ्यास करा.
ग्रुप स्टडी दरम्यान हे करा
परीक्षेदरम्यान ग्रुप स्टडीचं वेळापत्रक तयार करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवा. यामध्येही तुमच्या मनोरंजनासाठी वेळ काढा. फक्त अभ्यास करत राहिल्याने तुम्हाला ताण येऊ लागेल. चालणे, खेळ किंवा टीव्ही इत्यादीसाठी थोडा वेळ काढणे चांगले राहील.
खाण्यापिण्यावर द्या लक्ष
परीक्षा किंवा त्याच्या तयारीच्या वेळी तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली पाहिजे. चांगला डाएट प्लॅन घेतल्याने मन तंदुरुस्त राहते, गोष्टी बरोबर लक्षात राहतात आणि एकाग्रता शक्तीही वाढते.
Study Tips: अभ्यासासाठी पहाटे उठायचंय पण जाग येत नाही? मग या टिप्स येतील कामी
अवांतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा
जर तुम्ही ग्रुप स्टडीज करत असाल तर अभ्यासाच्या दरम्यान इतर अवांतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा. इतर कोणतेही विषय काढून स्वतःच मन विचलित होऊ देऊ नका. अभ्यासावर लक्ष द्या. रिकाम्या वेळात तुम्ही अवांतर बोलू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.