Home /News /career /

क्या बात! स्टेशनवरचा वायफाय वापरून केला अभ्यास, हमालाने क्रॅक केली UPSC Exam

क्या बात! स्टेशनवरचा वायफाय वापरून केला अभ्यास, हमालाने क्रॅक केली UPSC Exam

काही घटना या आपल्या विचारांच्या पलीकडच्या असतात. ही त्यापैकी एक...

    तिरुवअनंतपुरम, 7 जानेवारी : केरळमधल्या (Kerala) एका हमालाने (Coolie) केवळ स्मार्टफोन (Smartphone) आणि मोफत वायफायच्या (Free Wifi) मदतीने नागरी सेवा परीक्षेत (Civil Service Exam) घवघवीत यश मिळवलं आहे. श्रीनाथ के. (Shreenath K.) असं या हमालाचं नाव आहे. अभ्यासाठी पुरेशा गोष्टींचा अभाव असतानाही श्रीनाथ केरळ लोकसेवा आयोगाची, (KPSC) तसंच यूपीएससीची (UPSC) परीक्षा पास झाला आहे. `कलिंगा टीव्ही`नं दिलेल्या वृत्तानुसार, मूळचा केरळमधल्या मुन्नार (Munnar) जिल्ह्यातला असलेला श्रीनाथ एर्नाकुलम येथे हमाल म्हणून काम करत होता. 2018 मध्ये श्रीनाथला कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी आपलं उत्पन्न तुटपुंजं असल्याची जाणीव झाली. मुलीच्या भविष्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आर्थिक चणचण जाणवता कामा नये, असं त्याला वाटू लागलं. त्यामुळे तो डबल शिफ्टमध्ये काम करू लागला. परंतु, तरीदेखील दररोज 400 ते 500 रुपयांच्या वर कमाई होत नव्हती. ही परिस्थिती बदलली पाहिजे, असं श्रीनाथला मनोमन वाटत होतं. यासाठी उपलब्ध साधनांच्या आधारे त्यानं नागरी सेवा परीक्षेसाठी तयारी सुरू केली. त्यासाठी तो मुंबईलादेखील आला. श्रीनाथला परीक्षेसाठी क्लासेस लावणं आणि त्यांची फी देणंही शक्य नव्हतं. अशा स्थितीत स्मार्टफोन त्याच्या कामी आला. पुस्तकांवर खर्च करण्याऐवजी त्यानं हेडफोन (Headphone), मेमरी कार्ड (Memory card) आणि सिम कार्डवर (Sim card) पैसे खर्च केले. जानेवारी 2016 मध्ये सरकारने मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा सुरू केल्याचं त्याला माहीत होतं. त्यामुळे त्यानं पुस्तकं आणि क्लासेसच्या फीवर खर्च करण्याऐवजी स्मार्टफोनच्या मदतीने ऑनलाइन लेक्चर्स (Online Lectures) जॉइन करण्याचा निर्णय घेतला. कठोर परिश्रम आणि समर्पित भावनेच्या जोरावर श्रीनाथ `केपीएससी`ची परीक्षा उत्तीर्ण झाला. या परीक्षेनंतर त्याची महसूल विभागांतर्गत गाव क्षेत्र सहायक पदावर नियुक्ती झाली; पण या नोकरीवर तो समाधानी नव्हता. यामुळे त्याने तयारी सुरू ठेवून यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. हे ही वाचा-Success: CAT परीक्षेत पुण्याच्या यशनं केली कमाल; पहिल्याच प्रयत्नात झाला टॉपर `यूपीएससीसाठी`च्या प्रत्येक प्रयत्नादरम्यान श्रीनाथ त्याच्या ध्येयाप्रति अधिक केंद्रित आणि समर्पित होत गेला. श्रीनाथ चौथ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि त्याचं स्वप्न सत्यात उतरलं. याबाबत श्रीनाथ म्हणतो, `स्टेशनवरच्या मोफत वायफाय सुविधेमुळे मी हे यश मिळवू शकलो. मी हेडफोन लावून लेक्चर ऐकत असे. माझ्या मनातच प्रश्नावली सोडवत होतो. मोकळा वेळ मिळाला की रिव्हिजन करत होतो. अशा खडतर स्थितीत मी हे यश मिळवलं आहे.` रेल्वे स्टेशनवरचा हमाल ते देशातला वरिष्ठ सरकारी अधिकारी बनण्याचा श्रीनाथचा अविश्वसनीय प्रवास लाखो युवकांसाठी प्रेरणादायी आहे. दरम्यान, यूपीएससी नागरी सेवेची मुख्य परीक्षा वेळापत्रकानुसार होणार आहे. ही परीक्षा 7 जानेवारी ते 16 जानेवारीदरम्यान पार पडेल. मोठ्या संख्येनं विद्यार्थी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत होते; मात्र कोविड-19च्या (Covid -19) पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेऊन परीक्षा घेतली जाणार आहे.
    First published:

    Tags: Kerala, Online

    पुढील बातम्या