Home /News /career /

Students Protest: राज्यात रस्त्यावर का उतरले 10वी, 12वीचे विद्यार्थी? अचानक का पेटला मुद्दा? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Students Protest: राज्यात रस्त्यावर का उतरले 10वी, 12वीचे विद्यार्थी? अचानक का पेटला मुद्दा? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ऑफलाईन परीक्षांविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन  (Board students protest in Maharashtra) सुरु केलं आहे

ऑफलाईन परीक्षांविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन (Board students protest in Maharashtra) सुरु केलं आहे

अचानक विद्यार्थी रस्त्यावर का उतरले? (why student protesting in Maharashtra?) नक्की विद्यार्थ्यांच्या मागण्या काय? याबद्दल जाणून घेऊया.

मुंबई, 31 जानेवारी: देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस (School and colleges) बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या (Online education) माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शाळा कॉलेजेस सुरु (School reopen in Maharashtra) झाले होते. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षाही ऑफलाईन (offline board exams in Maharashtra) पद्धतीनंच होतील अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी केली होती. मात्र आता अचानक संपूर्ण राज्यभरात बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षांविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन (Board students protest in Maharashtra) सुरु केलं आहे. आता शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. शाळांचं हे सतत बंद आणि चालू होण्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. असं असेल तरी ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यांनी ऑनलाईन पद्धतीनंच शाळा सुरु ठेवावी असे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी आज राज्यभरात ठिकठिकाणी ऑफलाईन परीक्षांविरोधात (board exam Students protest in Maharashtra) मोर्चे काढत घोषणाबाजी केली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केला लाठीचार्ज इतकंच नाही तर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. मात्र अचानक विद्यार्थी रस्त्यावर का उतरले? (why student protesting in Maharashtra?) नक्की विद्यार्थ्यांच्या मागण्या काय? आणि ऑनलाईन परीक्षांवर (why student seeking for online exams in Maharashtra) विद्यार्थ्यांचा भर का? याबद्दल जाणून घेऊया. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून आता यंदाच्या 10वी, 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत केली होती. मात्र त्यानंतर कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट omicron नं परत चिंता वाढवली आणि राज्यातील शाळा आणि कॉलेजेस पुन्हा बंद करण्याची वेळ आली होती. मात्र आता शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. तरीही बोर्डाच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनच होणार अशा मतावर शिक्षणमंत्री ठाम आहेत. काय आहे विद्यार्थ्यांची मागणी "संपूर्ण वर्ष आमचं शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आलं आणि आता परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं का? त्यामुळे परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनंच घेण्यात याव्यात" अशी मागणी विद्यार्थ्यांकडून संपूर्ण राज्यभरात करण्यात येत आहे. यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले (Reason behind student protest in Maharashtra) आहेत. अचानक का पेटला मुद्दा मात्र हा मुद्दा अचानक का पेटला हे समजून घेणं आवश्यक आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनंच घेण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली होती. तसंच यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी अडचणी येतील असा विचार बहुतेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असावा म्हणूनच राज्यभरात ऑफलाईन परीक्षांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तसंच ऑनलाईन वर्ग आणि ऑफलाईन परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अजूनच कठीण होईल म्हणूनही ऑनलाईन परीक्षांची मागणी करण्यात येत असावी. कशा होणार CBSE, ICSE बोर्डाच्या परीक्षा या आधी CBSE आणि ICSE बोर्डानं दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्याची अंमलबजावणीहे केली आहे. यापुढील बोर्डाच्या परीक्षा या दोन टर्ममध्ये घेतल्या जातील असं CBSE बोर्डानं स्पष्ट केलं आहे. त्यानुसार CBSE Term 1 परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यातही आली आहे. लवकरच CBSE ची टर्म 2 परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यामुळे CBSE च्या विद्यार्थ्यांना हे सोयीचं असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांवर ताणही कमी असणार आहे. काय आहे शालेय शिक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया  "आम्ही विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेबाबत सातत्याने चर्चा करत आहोत. मी विद्यार्थ्यांना माझ्याशी चर्चा करण्यास सांगितले आहे. ही चर्चा केल्यानंतरच  मी पुढील निर्णय घेईन. परंतु आम्हाला शालेय विद्यार्थ्यांचे दोन वर्षांचे शैक्षणिक नुकसानही लक्षात ठेवावे लागेल" असं शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी म्हंटलं आहे. 12th Pass Jobs: मुंबईच्या पंजाब नॅशनल बँकेत 'या' पदांसाठी Vacancy; इथे करा अर्ज यावर तोडगा काय? विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांना नक्की कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय हे बघण्याची गरज आहे. तसंच ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी तितकी सक्षम प्रणाली सरकारकडे आहे का हेही बघण्याची गरज असणार आहे. ऑनलाईन परीक्षांचं महत्त्वं खरंच ऑफलाईन परीक्षेइतकं आहे का? विद्यार्थ्यांनी यावर विचार करण्याची गरज आहे.
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Board Exam, Career, Maharashtra, Protest, Students, Varsha gaikwad

पुढील बातम्या