नवी दिल्ली, 11 डिसेंबर : कोरोनाच्या (Coronavirus) संकटाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. त्याचबरोबर परीक्षा देखील ऑनलाईन होत आहेत. अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याची देखील मागणी करण्यात येत होती. तसंच होमवर्क देखील कमी करण्याची मागणी देखील करण्यात येत होती. त्यानंतर आता राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये (national-education-policy) बदल करण्यात आले असून दुसरीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना होमवर्क (homework ) म्हणजेच घरचा अभ्यास देता येणार नाही. स्कूल बॅग 2020 पॉलिसीमध्ये (homework policy ) याचा उल्लेख करण्यात आला असून तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्याना देखील दिलासा देण्यात आला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्कुल बॅग पॉलिसी 2020 प्रसिद्ध केली असून यामध्ये विद्यार्थ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच दफ्तराच्या वजनासंबंधी देखील नियम बनवण्यात आले आहेत.
अभ्यासाच्या तासांवर लक्ष
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या तासांसंबंधी निर्णय घेण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. समोरासमोर शिक्षण आणि अभ्यासाचे तास लक्षात घेऊन यासंबंधी निर्णय घेण्यात आले आहेत.
हे वाचा - School Reopen: 'या' राज्यात 14 डिसेंबरपासून सुरू होणार शाळा
सहावी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या होमवर्कविषयी माहिती देताना आठवड्यातून 5 ते 6 तासांपेक्षा अधिक होमवर्क देण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दररोज 1 तासापेक्षा अधिक होमवर्क विद्यार्थ्यांना देता येणार नाही. या नवीन नियमांमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांची जास्त होमवर्कमधून सुटका होणार आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इयत्तांसाठीही नियम
या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी देखील नवीन नियम बनवण्यात आले असून त्यांचे देखील होमवर्कचे तास कमी करण्यात आले आहेत. या वर्गातील विद्यार्थ्यांना आठवड्यात 10 ते 12 तासांपेक्षा जास्त होमवर्क देता येणार नाही. म्हणजेच दिवसाला जास्तीतजास्त 2 तास होमवर्क दिला जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
हे वाचा - CBSE Exam 2021 : दहवी आणि बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणार
देशातील परिस्थिती, भविष्यातील आव्हानं, शिक्षण घरोघरी पोहचवण्याचा प्रयत्न, विद्यार्थ्यांची परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारत सरकारने नवं शैक्षणिक धोरण ठरवलं आहे. यात मुलांचं कौशल्य विकसन व नैसर्गिक विकासावर भर देण्यात आल्यामुळे त्याचं देशभर कौतुक होत आहे. यातूनच भारताचे भविष्यातील सजग नागरिक घडणार आहेत.