कठुआ, 26 डिसेंबर: जम्मू आणि काश्मीर हे भारतातलं सर्वात धगधगतं राज्य आहे. येथे नेहमीच कोणता ना कोणता संघर्ष सुरू असतो. त्यामुळे येथील लोकांचं जगणं इतर राज्यांतील लोकांपेक्षा काही अंशी कठीणचं असतं. येथे नेहमीच दहशतवादी हल्ले, कर्फ्यू, आंदोलनं होतात. यामुळं लोकांना घराबाहेरही पडता येत नाही. पण अशा राज्यातून एक महिला पारंपरिक व्यावसायाला छेद देत, जेव्हा एक बस ड्रायव्हर बनते, ते खरंच कौतुकास पात्र ठरतं. ही महिला जम्मू काश्मीर राज्यातील पहिली महिला बस ड्रायव्हर आहे.
जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेल्या पूजा देवीनं इतिहास रचला आहे. त्या काश्मीरच्या पहिल्या महिला बस चालक बनल्या आहेत. पण त्यांचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नाही. त्यांनी केलेला संघर्ष आणि मिळवलेल्या यशातून महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे पून्हा एकदा अधोरेखित केलं आहे. लहानपणापासूनच त्यांना मोठ्या मोटारी चालवण्याची इच्छा आणि आवड होती. मोठी वाहनं चालवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे. त्यामुळेचं त्या आज या ठिकाणी पोहोचू शकल्या आहेत.
(हे वाचा-व्यावसायिकांची सीतारामन यांना साद, ITR भरण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी)
आता त्या बस चालवतात
23 डिसेंबर रोजी सकाळी त्यांनी त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी सर्वप्रथम कठुआ मार्गावर बस चालवली. येथील प्रत्येकाला ही बाब नवीन होती. त्यामुळं सर्व प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसत होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी ड्रायव्हिंग शिकण्यासाठी टॅक्सी चालवली होती. नंतर त्यांनी जम्मूमध्ये ट्रकही चालविला होता. पण आज त्या स्थानिक प्रवासी बस चालवत आहेत. त्या फारशा शिक्षित नाहीत, पण त्या जे काम करतात त्यामध्ये त्या सर्वोत्कृष्ट आहेत.
(हे वाचा-'थप्पड' फेम तापसी पन्नू रांचीतील लिट्टी-चोखाच्या प्रेमात)
कुटुंब आणि नवऱ्याचा होता विरोध
इथपर्यंत पोहचणं त्यांच्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं. कुटुंबियांची आणि नवऱ्याची इच्छा नसताना त्या आपल्या स्वप्नासाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. आज त्यांना बस ड्रायव्हर म्हणून पहिल्यांदा नोकरी मिळाली आहे. त्यामुळं त्यांचा आनंद गंगनात मावत नव्हता. त्यांनी यावेळी सांगितलं की 'पहिल्यांदा बस चालवल्यामुळे खूपच आनंद झाला आहे. मी या अगोदर टॅक्सी आणि ट्रक चालवला आहे. पण एक दिवस मी बस चालवेल, याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. पण आज मला खुप आनंद होतोय. यामुळं मी आता इतर महिलांना वाहन चालवण्यास शिकवणार आहे. '