मुंबई, 26 मार्च: तुम्ही जर नर्सिंग विषयाचे शिक्षण घेतले असेल आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. SAIL अर्थात स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नर्सिंग ट्युटर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, हे पद तात्पुरत्या स्वरूपाचे असेल. सेलने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. सेल रिक्रुटमेंट 2023 च्या अधिसूचनेनुसार, नर्सिंग ट्युटरची दोन पदं असून निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती सहा महिने कालावधीसाठी असेल. मात्र हा कालावधी पुढे वाढवला जाऊ शकतो. या पदासाठी उमेदवारांची निवड ही वैयक्तिक मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या पदांसाठीची वैयक्तिक मुलाखत 28 मार्च 2023 ला होणार आहे. या पदासाठीचे निकष, शैक्षणिक पात्रता आणि वेतनासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सेल रिक्रुटमेंट 2023 नुसार, सेलमध्ये नर्सिंग ट्युटरच्या दोन रिक्त जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 25,000 रुपये वेतन देण्यात येईल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय मुलाखतीच्या तारखेपर्यंत 35 वर्षांपेक्षा कमी असावे. निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाईल. पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी 28 मार्च 2023 रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजेदरम्यान वॉक-इन मुलाखतीसाठी कन्फ्ल्युइन्स, बर्नपूर पोस्ट ऑफिससमोर, भारती भवन जवळ, बर्नपूर - 713325, जि. पश्चिम वर्धमान, पश्चिम बंगाल या ठिकाणी उपस्थित राहावे. यावेळी उमेदवारांनी सोबत पूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि त्याच्या झेरॉक्स कॉपीज आणाव्यात, असे आवाहन सूत्रांनी केले आहे.
हेही वाचा - Career Tips: महिन्याला लाखो रुपये कमावणारे Data Analyst व्हायचंय? आधी शिका 'हे' टेक्निकल स्किल्स
या पदासाठी इच्छुक उमेदवार केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठ अथवा संस्थेतून इंटरमिजिएट (10+2) उत्तीर्ण झालेला असावा. उमेदवाराने भारतीय नर्सिंग काउन्सिलशी (आयएनसी) संलग्न मान्यताप्राप्त संस्था किंवा कॉलेजमधून बीएस्सी (नर्सिंग)/ पीबी बीएस्सी (नर्सिंग)/ एमएस्सी (नर्सिंग) पदवी मिळवलेली असावी. त्याचप्रमाणे उमेदवाराला किमान दोन वर्षांचा अध्यापन किंवा क्लिनिकल क्षेत्रातला अनुभव असावा.
उमेदवार पश्चिम बंगाल नर्सिंग काउन्सिल अंतर्गत नोंदणीकृत असणं आवश्यक आहे आणि त्याच्याकडे वैध नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे याप्रमाणे शैक्षणिक पात्रता असेल आणि कामाचा अनुभव असेल तर तुम्ही सेलच्या या संधीचा लाभ नक्कीच घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Government