मुंबई, 11 ऑक्टोबर: राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई (State Health Guarantee Society Recruitment 2021) इथे लवकरच काही वैद्यकीय पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Rajya Arogya Hami Society Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. मुख्य वैद्यकीय सल्लागार, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय सल्लागार या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
मुख्य वैद्यकीय सल्लागार (Chief Medical Consultant)
प्रशासकीय अधिकारी (Medical Consultant)
वैद्यकीय सल्लागार (Administrative Officer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
मुख्य वैद्यकीय सल्लागार (Chief Medical Consultant) - MBBS आणि क्लिनिकल फिल्डमध्ये पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक. तसंच उमेदवार सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांना वीस वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.
हे वाचा- Pune Job Alert: भारती विद्यापीठ पुणे इथे विविध पदांसाठी नोकरची संधी
प्रशासकीय अधिकारी (Medical Consultant) - MBBS आणि क्लिनिकल फिल्डमध्ये पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक. तसंच उमेदवार सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांना वीस वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.
वैद्यकीय सल्लागार (Administrative Officer) - महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयातून सेवानिवृत्त अधिकारी आणि वीस वर्षांचा अनुभव आवश्यक.
इतका मिळणार पगार
मुख्य वैद्यकीय सल्लागार (Chief Medical Consultant) - सेवानिवृत्त उमेदवरांना सरकारी नियमानुसार आणि इतर उमेदवारांना 80,000/- रुपये प्रतिमहिना.
प्रशासकीय अधिकारी (Medical Consultant) - सेवानिवृत्त उमेदवरांना सरकारी नियमानुसार आणि इतर उमेदवारांना 70,000/- रुपये प्रतिमहिना
वैद्यकीय सल्लागार (Administrative Officer) - सेवानिवृत्त उमेदवरांना सरकारी नियमानुसार वेतन देण्यात येईल.
हे वाचा- Government Jobs: नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीमध्ये भरती; 60,000 मिळणार पगार
अर्ज पाठवण्याचा पत्ता
जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400018
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर 2021
JOB ALERT | State Health Guarantee Society Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | मुख्य वैद्यकीय सल्लागार (Chief Medical Consultant) प्रशासकीय अधिकारी (Medical Consultant) वैद्यकीय सल्लागार (Administrative Officer) |
शैक्षणिक पात्रता | MBBS आणि क्लिनिकल फिल्डमध्ये पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक. तसंच उमेदवार सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांना वीस वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. |
इतका मिळणार पगार | 70,000/- रुपये प्रतिमहिना - 80,000/- रुपये प्रतिमहिना. |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400018 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.jeevandayee.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Mumbai, जॉब