मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Mumbai Job Alert: राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई इथे नोकरीची संधी; 50 हजारांच्या वर पगार

Mumbai Job Alert: राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई इथे नोकरीची संधी; 50 हजारांच्या वर पगार

 अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 09 सप्टेंबर: राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई (State Health Guarantee Society) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय सल्लागार, प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती    

वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant)

प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer)

पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant) - MBBS पदवी असणं आवश्यक.

प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) - महाराष्ट्र फायनान्स आणि अकाउंट सर्व्हिसमधून सेवानिवृत्त ऑफिसर.

इतका मिळणार पगार

वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant) - सर्व्हिसमधून सेवानिवृत्त ऑफिसरसाठी GR नुसार, तर इतरांसाठी Rs.50,000/- प्रति महिना

प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) -  सर्व्हिसमधून सेवानिवृत्त ऑफिसरसाठी GR नुसार

हे वाचा - BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिका इथे होणार भरती; तब्बल 2 लाख रुपये पगार

या पत्त्यावर पाठवा अर्ज

जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई –400018.

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  17 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.jeevandayee.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Mumbai