मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मराठा विद्यार्थ्यांसाठी अशोक चव्हाण उतरले मैदानात; EWS प्रमाणपत्रावरून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठा विद्यार्थ्यांसाठी अशोक चव्हाण उतरले मैदानात; EWS प्रमाणपत्रावरून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

अशोक चव्हाण & मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अशोक चव्हाण & मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तहसीलदार अशा विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत. असा आरोप कम माहिती देऊ करणारं एक पत्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 10 ऑगस्ट: गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षण आणि नोकरीत मराठा आरक्षण देण्याचा निर्णय अजूनही रखडला आहे. त्यामुळे EWS म्हणजे इकोनॉमिकली विकर सेक्शन या पर्यायांमधून अनेक मराठा शिक्षणचा आणि स्पर्धा परीक्षेत लाभ मिळतो आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना या EWS प्रमाणपत्रासाठी तहसीलदार कार्यालयात जाऊन आपले तळवे झिजवावे लागत आहेत. तहसीलदार अशा विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत. असा आरोप कम माहिती देऊ करणारं एक पत्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्ष्ण रद्द केल्यानंतर त्याकाळात अपूर्णावस्थेत असलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाचे (ईडब्ल्यूएस) लाभ देण्याचा निर्णय मागील राज्य सरकारच्या काळात घेण्यात आला होता. त्या निर्णयाला महावितरणच्या भरतीतील काही ईडब्ल्यूएस उमेदवारांनी आव्हान दिले होते. आणि तो निर्णय मा. उच्च न्यायालयाने रद्द केला होता. मात्र तरीही विद्यार्थ्यांना त्यांचे EWS प्रमाणपत्र मिळण्यास टाळाटाळ होत आहे असं अशोक चव्हाण आणि लिहिलेल्या पत्रात म्हंटलं आहे. एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाचे (ईडब्ल्यूएस) लाभ देण्याचा निर्णय केवळ अपूर्णावस्थेत असलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गातील तत्कालीन उमेदवारांसाठी होता. त्या निर्णयाचा मराठा विद्यार्थ्यांना इंडब्ल्यूएसचे लाभ मिळण्याविषयी काहीही संबंध नाही. तरी देखील या निर्णयाच्या माहितीच्या आधारे तहसीलदार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहेत अशा तक्रारी येत आहेत. तसंच  प्रमाणपत्र  देण्यात टाळाटाळ होत आहे असंही पत्रात म्हंटलं आहे. संबंधित विभागामार्फत जिल्हा व तालुका प्रशासनांना तातडीने निर्देश देऊन मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत कोणताही न्यायालयीन अडसर नसल्याचे स्पष्ट करावे अशी विनंती अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसंच सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया तसेच नोकरभरती प्रक्रियांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करावी आणि विद्यार्थ्यांना त्यांची EWS प्रमाणपत्र लवकर मिळवून द्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलं आहे.
First published:

Tags: Career

पुढील बातम्या