• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • SBI PO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये PO पदाच्या तब्बल 2056 जागांसाठी भरती; इतका मिळेल पगार

SBI PO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये PO पदाच्या तब्बल 2056 जागांसाठी भरती; इतका मिळेल पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India Recruitment 2021) लंवकरच तब्बल 2056 जागांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना (SBI PO Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी ही भरती (SBI PO jobs 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) - एकूण जागा 2056 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अंतिम वर्षातील विद्यार्थीही अप्लाय करू शकणार आहेत. मात्र मुलाखतीच्यावेळी त्यांना पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्याचा दाखला देणं आवश्यक असणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटची पात्रता असलेले उमेदवार हे करू शकतात. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर इथे 1,42,400 रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज इतका मिळणार पगार प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) - 41,960/- रुपये प्रतिमहिना आणि काही आवश्यक सुविधा. वयोमर्यादा या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांचं वय हे 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी यामध्ये सूट देण्यात येणार आहे. अशी होणार निवड या पदभरतीसाठी सुरुवातीला प्रिलिमिनरी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 100 मार्कांची असणार आहे. यामध्ये तीन सेक्शन असणार आहेत, प्रत्येक सेक्शनवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. या परीक्षेनंतर mains परीक्षा होणार आहे. यानंतर मुलाखती घेतल्या जाणार आहेत. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 700/- रुपये इतर सर्व प्रवर्गांसाठी - फी नाही. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 'या' पदांसाठी होणार भरती; 13,000 रुपये पगार अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2021
  JOB TITLE SBI PO Recruitment 2021
  या पदांसाठी भरती प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) - एकूण जागा 2056
  शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक
  इतका मिळणार पगार 41,960/- रुपये प्रतिमहिना आणि काही आवश्यक सुविधा.
  अशी होणार निवड सुरुवातीला प्रिलिमिनरी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 100 मार्कांची असणार आहे. यामध्ये तीन सेक्शन असणार आहेत, प्रत्येक सेक्शनवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. या परीक्षेनंतर mains परीक्षा होणार आहे. यानंतर मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/sbiposasep21/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: