मुंबई, 24 जुलै: स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबईमध्ये (State Bank Of India mumbai recruitment) लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सेवानिवृत्त (retire officers) झालेल्या अधिकाऱ्यांसाठी ही पदभरती असणार आहे. बिझनेस कॉरेस्पोंडंट फैसिलिटेटर या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी अधिकृत ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
बिझनेस कॉरेस्पोंडंट फैसिलिटेटर (Business Correspondent Facilitator) - एकूण जागा 40
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे संबंधित क्षेत्रात अनुभवांसह सेवानिवृत्त अधिकारी असणं आवश्यक आहे. अनुभवानुसार प्राधान्य दिलं जाणार आहे.
हे वाचा - GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे भरती
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.