Home /News /career /

खाण्याची आवड असेल तर सुरू करा हा व्यवसाय; लाखोंमध्ये होईल कमाई

खाण्याची आवड असेल तर सुरू करा हा व्यवसाय; लाखोंमध्ये होईल कमाई

या आदेशानंतर 7 दिवसांत Pollution Under Control Certificate अर्थात PUC सर्टिफिकेट घ्यावे लागेल. असं न झाल्यास वाहनाचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाईल.

या आदेशानंतर 7 दिवसांत Pollution Under Control Certificate अर्थात PUC सर्टिफिकेट घ्यावे लागेल. असं न झाल्यास वाहनाचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाईल.

विशेष म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारदेखील मदत करणार आहे.

    नवी दिल्ली, 5 डिसेंबर : देशभरात सध्या कोरोनाचा (Coronavirus) धुमाकूळ सुरु आहे. या संकटामध्ये अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे तुम्ही या संकटात नवीन व्यवसायाची सुरुवात करून चांगली कमाई करू शकता. सध्या बेकरी व्यवसायाला( bakery business ) मोठी मागणी आहे. यामुळे तुम्ही कोणताही व्यवसाय किंवा प्रोफेशनल कोर्स करू इच्छित असल्यास तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला या व्यवसायाविषयी सांगणार असून यामधून तुम्ही किती पैसे कमवू शकता याची माहिती देखील तुम्हाला देणार आहोत. प्रोफेशनल कोर्स करू शकता हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल शिक्षण घेणे आवश्यक आहे. बेकरी व्यवसायात तुम्हाला पदार्थांच्या सजावटीबरोबरच तापमानाची देखील माहिती असणे गरजेचे आहे. हा प्रोफेशनल कोर्स तुम्ही कोणत्याही कॉलेजमधून करू शकता. बिझनेस प्लॅन तयार करावा लागेल हा व्यवसाय सुरु करण्याआधी तुम्हाला एक प्लॅन तयार करावा लागेल. या व्यवसायात तुम्हाला कोणकोणत्या पदार्थांची विक्री करायची आहे हे पहिले ठरवावे लागेल. केक (cake), पेस्ट्री (Pastry), ब्रेड (Bread), ड्राय केक (Dry Cake) यासारखे पदार्थ तुम्ही विक्रीसाठी ठेवू शकता. याचबरोबर तुमचा व्यवसाय ऑनलाईन चालणार आहे की ऑफलाईन हेदेखील तुम्हाला ठरवावे लागणार आहे. सरकारदेखील करणार मदत तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारदेखील मदत करणार आहे. मुद्रा स्कीम अंतर्गत (mudra scheme) व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला एक लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. यामध्ये एकूण खर्चाच्या 80 टक्के मदत सरकारकडून मिळणार आहे. सरकारने यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला असून यामध्ये सर्व खर्च वजा करून तुम्ही महिन्याला 30 हजार रुपयांपर्यंतचा नफा मिळवू शकता. व्यवसायासाठी किती खर्च येणार व्यवसायासाठी एकूण 5 लाख 36 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये गुंतवणूक करायची आहे. मुद्रा स्कीम अंतर्गत तुमची निवड झाल्यास तुम्हाला बँकेकडून 2 लाख 87 हजार रुपयांचे टर्म लोन आणि 1 लाख 49 हजार रुपयांचे कॅपिटल लोन मिळेल. 500 स्क्वेअर फूट पर्यंतची जागा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. स्वतःची जागा नसेल तर भाडेतत्त्वावरील जागेचे कागदपत्र सादर करावे लागणार आहेत. इतका होणार फायदा  सरकारच्या प्रोजेक्टनुसार यामध्ये 5 लाख 36 हजार रुपयांमध्ये उत्पादन आणि विक्रीनंतर किती फायदा मिळणार मिळणार याचा हिशोब मांडण्यात आला आहे. 1)संपूर्ण वर्षाची कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन : 4.26 लाख रुपये 2) संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला विक्रीतून 20.38 लाख रुपये मिळणार आहेत. यामध्ये तुमच्या बेकरी पदार्थांची किंमत ही मार्केटमधील इतर पदार्थांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. 3)ग्रॉस ऑपरेटिंग प्रॉफिट : 6.12 लाख रुपये 4)विक्री आणि व्यवस्थापन खर्च : 70 हजार रुपये 5)बँकेतील कर्जाचे व्याज :60 हजार 6)अन्य खर्च :60 हजार 7)निव्वळ नफा : वर्षाला 4.2 लाख रुपये मुद्रा स्कीममध्ये करा अर्ज  पंतप्रधान मुद्रा योजनेनंतर्गत(PM mudra scheme) तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये अर्ज करू शकता. या अर्जामध्ये तुम्हाला नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षणं, सध्याचे इन्कम आणि किती कर्ज हवे आहे याची माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी आणि गॅरंटी तुम्हाला द्यावी लागणार नसून 5 वर्षांच्या आत तुम्ही हे कर्ज फेडू शकता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Small business

    पुढील बातम्या