• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • SSC Result: माकडाचे खेळ दाखवणाऱ्या आईचे मुलाने पांग फेडले, शाळेत पटकावला अव्वल नंबर

SSC Result: माकडाचे खेळ दाखवणाऱ्या आईचे मुलाने पांग फेडले, शाळेत पटकावला अव्वल नंबर

आई दिवसभर माकडाचे खेळ दाखवून चार जणांचा संसार चालवते. तिने कमावलेल्या पैशात कसेबसे दोन वेळचे जेवण मिळतं.

  • Share this:
ठाणे, 30 जुलै: राज्य माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. संघर्षातून फुललेल्या अनेक यशोगाथा समोर आल्या आहेत. मात्र, त्यात उथळसर येथे राहणाऱ्या राहुल यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हेही वाचा...'एलिझाबेथ एकादशी'मधल्या झेंडूला गणितात मिळाले चक्क 100 पैकी 42 नव्हे 96 गुण राहुलने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महापालिका शाळेतून अव्वल आला आहे. राहुल याला 76 टक्के गुण मिळले. आजच्या घडीला हजारो मुलांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. पण राहुलच्या यशामागे सिंहाचा वाटा त्याच्या आईचा आहे. आई दिवसभर माकडाचे खेळ दाखवून चार जणांचा संसार चालवते. तिने कमावलेल्या पैशात कसेबसे दोन वेळचे जेवण मिळतं. परंतु आयुष्यात काहीतरी करायचं, या जिद्दीने राहुल अभ्यासाला लागला. घरात जागा नाही म्हणून उथळसर येथील महापालिका शाळा नं 2 चा हा विद्यार्थी जवळच्याच बुध्दविहारात जाऊन अभ्यास करू लागला. आपला अभ्यास झाल्यावर तो आपले मित्र आणि इतर मुलांना देखील शिकवू लागला. दररोज पाच ते सहा तास अभ्यास करणारा राहुल खेळ देखील भरपूर खेळत होता. त्याने मिळवलेल्या या यशाने त्याची आई अत्यानंदित झाली असून त्याने शिक्षक बनून समाजाची सेवा करावी अशी इच्छा राहुलच्या घरच्यांनी व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा मुलींचीच बाजी.... दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनामुळे यंदाच्या दहावीचा निकाल उशिरानं जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागल्याती माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. मुख्य म्हणजे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची निकाल सर्वात जास्त लागला आहे. तर, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागला आहे. कोरोनामुळे यंदा दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हेही वाचा..वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा प्रताप! प्रियकरासोबत घरातच केलं असं... यंदा एकूण 15 लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात मुलींचा निकाल 96.91% लागला असून मुलांचा निकाल 93.99% लागला आहे. तर, विभागवारीनुसार कोकण विभागाचा 98.77 टक्क्यांसह सर्वात जास्त लागला आहे. तर, त्यानंतर कोल्हापूरचा 97.64 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा निकाल लागला आहे. तर, पुण्याचा 97.34 आणि मुंबईचा 96.72 % लागला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: